पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१७) बाजारात मिळणारे सिंगल सुपर फॉस्फेट १८) पोटॅशियम फॉस्फेट, वगैरे... वगैरे... वगैरे. चिलटे येऊ लागल्यास वरील पदार्थ त्या कचऱ्यावर टाकावेत.

याही उपायाला जर चिलटांनी दाद दिली नाही, तर चक्क बाजारात मिळणारा छोटा एक्झॉस्ट अथवा केबिन फॅन, अविरतपात्रावर हवेचा झोत जाईल असा बसवा. दिवसातून थोड्यावेळ जरी हा पंखा चालू ठेवला, तरी चिलटे नाहीशी होतील. पंखा किती मोठा वापरायचा आणि कधी अन् किती वेळ चालू ठेवावा लागेल हे अर्थातच आपण अविरतपात्रात काय टाकले आहे त्यावर अवलंबून आहे.
 आजकाल आपली घरे खूपच लहान झाली आहेत. अविरतपात्र जर व्यवस्थित वापरले, तर छोट्या घरातसुद्धा ते चालू शकते. तरीपण काही लोकांच्या मनात ‘गांडूळे घरात इतस्तः वावरतील का ?' ‘चिलटं झाली तर काय करायचं ?' “घरात घाण वास येईल का ?', असल्या प्रश्रांनी अविरतपात्राबद्दल भीती असते. या भीतीपोटी ही मंडळी अविरतपात्र घरात लावू शकत नाहीत. मग त्यांनी काय करायचे ? जैविक कचरा असाच रस्त्यावर टाकून द्यायचा ! खचितच नाही. अशा वेळीसुद्धा आपल्याकडे एक मार्ग आहे.
 जैविक पदार्थ म्हणजेच आपण खातो ते आपले अन्न. त्याचे पोटात पचन होते आणि राहिलेले नको असलेले पदार्थ आपण विष्ठेवाटे बाहेर टाकून देतो. ही क्रिया जर आपण टाकून द्यायच्या जैविक पदार्थांवर केली, तर अविरत पात्राची जरूर लागणार नाही. एक मिक्सर या कामासाठी नेमावा. तोंडात अन्न जसे बारीक करून पोटात ढकलले जाते, तसे या मिक्सरमध्ये सर्व टाकाऊ जैविक पदार्थ बारीक करावेत आणि तयार झालेली पेस्ट चक्क ड्रेनेज लाईन मध्ये टाकावी. ड्रेनेज लाईन तुमचीच आहे. ती चोकअप झाली, तर तुम्हांलाच त्रास होईल. त्यामुळे नको असलेले आणि वापरून झालेले सर्व जैविक पदार्थ जास्तीत जास्त बारीक करावेत.

 अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्या ब्रह्माला असं ड्रेनेज लाइनमध्ये कसं सोडायच ही शंका काही शंकेखोर मंडळींना अस्वस्थ करीलच. अन्न पदार्थांतील उपयुक्त घटक म्हणजेच ब्रह्म. ते तर तुम्ही काढून घेतले आहे. मग राहिलेले, नको असलेले,


कचरा निर्मूलन - एक युद्ध * ४१