वापरून झालेले किंवा अन्यथा तुम्ही टाकून देणार आहात ते पदार्थ ब्रह्म कसे असतील ? ते अब्रह्मच. तेव्हा त्यांना जास्तीत जास्त अगदी पेस्ट स्वरूपात बारीक करून ड्रेनेज लाइनमध्ये टाकायला काहीच हरकत नाही. असं करण्यात एकच तोटा आहे, तो म्हणजे अविरतपात्रातून मिळणारे खत आपल्याला मिळणार नाही, पण परिसर स्वच्छ तर राहील.
'कचरा निर्मूलन','शून्य कचरा' हे एक प्रकारचे युद्धच आहे. कारण येथे सतत जिवंत गोष्टींशी आपली गाठ पडते. युद्ध दोन गटांत चालते. एका गटाने एक चाल केली की त्यावर मात करण्यासाठी दुसरा गट त्यावर दुसरी चाल करतो. येथेही असेच होते. चिलटांवर झेंडूच्या फुलांचे अस्त्र सोडले की काही दिवसांतच चिलटे झेंडूच्या फुलांना मानेनाशी होतात. झेंडूच्या वासाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यात तयार होते. तो निसर्गनियमच आहे. अशा वेळी चिलटांसारख्या क:पदार्थ प्राण्यावर विजय मिळविण्यासाठी दुसरे कुठले तरी ‘वासास्त्र' त्यांच्यावर सोडणे भाग आहे. हे सतत चालणारे चक्र आहे. तेव्हा या लढाईला अंत नाही.
नुसते अविरत पात्रात कचरा टाकून कचरा निर्मूलन होणार नाही. त्या पात्राकडे सतत जागरूकपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तरच आपण विजयाची इच्छा धरू शकतो. अन्यथा चिलटांकडून हार पत्करण्याची नामुष्की आपल्यावर येईल.
तेव्हा सावधान ! शत्रू सीमेपर्यंत आला आहे. विजयासाठी तयार व्हा !
पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/44
Jump to navigation
Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
अडचणी येणार,
प्रश्न पडणार,
थोडासा विचार केल्यास त्यातून मार्गही नक्कीच सापडणार.....
प्रश्न आहे, तुम्ही मनापासून ठरविणार आहात का की,
....... मी कचरा निर्माण करणार नाही.......
*
४२ * शून्य कचरा
