पान:शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७. वरीलप्रमाणे अविरतपात्र बनवणे अवघड वाटत असेल, तर मी हे अविरतपात्र त्या व्यक्तीस बनवून द्यायला तयार आहे. अर्थात योग्य किंमत घेऊन.
८. बास्केट टाईप अविरत पात्र वापरत असताना त्यात काही अडचणी येतात. १) अविरत पात्रातील पदार्थ उंदीर या प्राण्याचे पक्वान्न आहे. त्यामुळे उंदीर,चिचुंद्रया,घुशी अथवा खार या प्लॅस्टिकच्या बास्केटवर हल्ला करतात आणि ती चक्क तोडतात. २) या अविरत पात्रातील कचरा वारंवार हलवून वर-खाली करावा लागतो. ३) हे अविरत पात्र पूर्ण भरल्यानंतर बाहेरून अस्वच्छ दिसते. वरील तीन्ही दोषांचे निवारण करणारे असे ड्रम टाइप अविरत पात्र नव्याने तयार केले आहे. हा ड्रम पूर्णपणे फायबर ग्लासचा बनवलेला असल्यामुळे त्याला उंदीर आणि इतर प्राणी तोडू शकत नाहीत. त्याचप्रमाणे हे फायबर ग्लासचे असल्यामुळे गंजतदेखील नाही. या अविरत पात्राची क्षमता २० लिटरची आहे. हे अविरत पात्र एका कुटुंबासाठी उपयोगी आहे. यापेक्षा मोठे २०० लिटर क्षमतेचे साधारणपणे १२ ते १५ कुटुंबांसाठी उपयुक्त असे महाअविरत पात्रदेखील तयार केलेले आहे.
९. घरात एका कोपऱ्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या फोटोत दाखविल्याप्रमाणे अडकवाव्यात. यातील एका पिशवीत वापरून झालेले प्लॅस्टिक स्वच्छ करून टाकावे अन् दुसरीत करवंट्या जमा कराव्यात.


३४ * शून्य कचरा