पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्फोटकांचे संशोधनकार्य अधोरेखित करण्यात आले. उच्च शक्तिशाली स्फोटकांबाबत मूलभूत व प्रत्यक्षोपयोगी संशोधन करणा-या देशभरातील अगदी मोजक्या प्रयोगशाळांपैकी एच.ई.एम.आर.एल.ही एक असून डी.आर.डी.ओ.च्या अखत्यारीतील ती एक महत्त्वाची प्रयोगशाळा आहे. अत्यंत उच्च शक्तीची स्फोटके, प्लास्टीक स्फोटके कशी बनवावीत; त्यांची संरक्षक आवरणे कशी बनवावीत; त्यांचे नमुने कसे बनवावेत; अचूकपणे हव्या त्या ठिकाणी, हव्या त्या दाबाने त्यांचे स्फोट कसे घडवून आणावेत, या सर्वांसाठी आवश्यक ती रसायनभौतिकी, ज्वालाग्राहीपणा, त्यांना हाताळण्याच्या मानवी व संगणकीय प्रणाली याबाबत सतत संशोधन करणे, हे एच.ई.एम.आर.एल.चे कार्य आहे. जगभरात सतत निर्माण होणा-या नवनवीन अति शक्तिशाली स्फोटक पदार्थाची परीक्षा, विश्लेषण, पृथ:करण करीत राहणे, हाही संस्थेच्या कामाचा भाग आहे. अति शक्तिशाली स्फोटक पदार्थ निर्मितीसाठी लागणारे अन्य अ-स्फोटक पदार्थ, त्यांची निर्मिती, यासह एकंदर स्फोटक पदार्थ निर्माण कारखान्यांना संबंधित तंत्रज्ञान हस्तांतरित करणे; उत्पादनावर लक्ष ठेवून त्याचा दर्जा सतत अव्वल राहील हे पाहणे, हा सुद्धा एच.ई.एम.आर.एल.च्या कार्यात मोडणारा भाग आहे. सैनिकी शाळा, सातारा देशभरातल्या एकंदर अठरा सैनिकी शाळांपैकी सातारा येथील शाळा ही पहिली सैनिकी शाळा होय. २३ जून १९६१ या दिवशी, तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांच्या हस्ते सातारा सैनिकी शाळेचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी मध्ये प्रवेश घेता यावा अशा दृष्टीने या शाळेत शिक्षण- प्रशिक्षण देण्यात येते. ही फक्त मुलांसाठी असलेली सैनिकी शाळा असून शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. सहावी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम इथे उपलब्ध असून तो सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सी.बी.एस.ई., नवी दिल्ली) यांच्याशी संलग्न आहे. सातारा सैनिकी शाळेची रचना येथे अतिशय सुसज्ज अशी विज्ञान प्रयोगशाळा आहे. येथील क्रिडा संकुलात एक अॅथलेटिक्स मैदान आणि एक पोहण्याचा तलाव यांसह एकूण पंधरा मैदाने असून तिथे हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल असे शारिरीक क्षमता वाढवणारे खेळ खेळले जातात. | येथे अतिशय अद्ययावत व सुसज्ज असे ग्रंथालय आहे. संरक्षण खंड / ५९१ शिल्पकार चरित्रकोश