पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न कार्याला प्रारंभ झाला. १९६७ साली तिचे 'इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी (आय.ए.टी.) असे नामकरण होऊन पुण्याजवळच गिरीनगर या ठिकाणी हलवण्यात आले. एप्रिल २००६ पासून आय.ए.टी.लाच 'डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डी.आय.ए.टी.)' असे नाव मिळाले आहे. | १९५० च्या दशकातल्या केवळ, शस्त्रास्त्र अध्ययन संस्थेपासून आज संरक्षणविषयक अतिप्रगत उच्च तंत्रज्ञानाचे संशोधन व विकास इथपर्यंत संस्थेची क्षितिजे विस्तारत गेली आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या प्रमाणित अध्ययन नमुन्याबरहकुम पुणे विद्यापीठाने एम.ई. अभियांत्रिकी शाखेतील पदवीसाठी आठ अभ्यासक्रम १९८० सालापासून प्रमाणित केले. सन २००० पासून डी.आय.ए.टी. संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. उच्च ऊर्जायुक्त सामग्री संशोधन प्रयोगशाळा हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबोरेटरी (एच.ई.एम.आर.एल.), पाषाण, पुणे एच.ई.एम.आर.एल. ही सुद्धा, संरक्षण खात्याच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डी.आर.डी.ओ.) च्या शस्त्रास्त्र संचालनालयाच्या अखत्यारीत येणारी एक प्रयोगशाळा आहे. उच्च शक्तियुक्त पदार्थ व स्फोटक पदार्थ यांच्या उत्पादन व तंत्रज्ञान विकासाबाबत संशोधन करणे हे या प्रयोगशाळेचे कार्य आहे. सध्या ए. शुभानंद राव हे एच.ई.एम.आर.एल. चे संचालक आहेत. | या संस्थेत रसायनतज्ज्ञ, भौतिकशास्त्र, गणितज्ञ; तसेच रसायन, मेकॅनिक्स व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांतल्या अभियंत्यासह एकूण बाराशे व्यक्ती काम करतात. मुलभूत व प्रत्यक्षोपयोगी संशोधनकार्याची पदव्युत्तर प्रयोगशाळा म्हणून मान्यता असलेल्या या संस्थेला खड्ज - ९००१:२००० हे प्रमाणपत्रही मिळालेले आहे. १९०८ साली म्हणजे ब्रिटीश काळात नैनिताल येथे स्थापन झालेली 'केमिकल एक्झामिनर्स ऑफीस' ही संस्था एच.ई.एम.आर.एल. ची पूर्वज होय. १९६० साली ती नैनितालहून पुण्याला आणण्यात आली व एक्स्प्लोझिव्हस् रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी (इ.आर.डी.एल.) असे तिचे नवे नामकरण करण्यात आले. १९६३ साली तिला संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचा दर्जा देण्यात येऊन डी.आर.डी.ओ.शी जोडण्यात आले. मार्च १९९५ पासून इ.आर.डी.एल. चे नामकरण एच.ई.एम.आर.एल. असे करण्यात येऊन तिथे चालणारे उच्च शक्तियुक्त ५९० / संरक्षण खंड शिल्पकार चरित्रकोश