पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एका वेळी सहाशे विद्यार्थी सामावू शकतील असे भव्य भोजनगृह येथे आहे. शाकाहारी-मांसाहारी दोन्ही प्रकारचे अन्नपदार्थ येथे उपलब्ध असतात. एक भव्य व्यायामशाळा, भव्य सभागृह, विशाल प्रेक्षागृह, सुसज रूग्णसेवा केंद्र व पालक-पाहुणे यांच्यासाठी सुखकारक असे निवासगृह अशा अन्य सुविधाही येथे आहेत. शाळेची एकंदर सहा विद्यार्थी वसतिगृहे असून ती पर्यवेक्षक, गृहप्रमुख, गृहशिक्षक, गटनेते इत्यादि अधिका-यांकरवी चालवली जातात. हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबलटेनिस, क्रिकेट, अॅथलेटिक्स, धावण्याच्या विविध प्रकारच्या शर्यती यांबरोबरच इथे अश्वारोहणही शिकवले जाते. अभ्यासाबरोबरच इथे कलामंडळ, संगीतमंडळ, काष्ठकला मंडळ, छायाचित्रण मंडळ, इंग्रजी साहित्य-नाट्य मंडळ, हिंदी साहित्य- नाट्य मंडळ, मराठी मंडळ, भौतिकशास्त्र मंडळ, जीवशास्त्र मंडळ, गणित मंडळ, रसायनशास्त्र मंडळ, ग्रंथालय मंडळ व विशेष म्हणजे विणकाम-भरतकाम मंडळ असे अन्य उपक्रम चालतात, भारताचे वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल प्रदिप वसंत नाईक हे सातारा सैनिकी शाळेचे स्नातक आहेत. ५९२ / संरक्षण खंड शिल्पकार चरित्रकोश