पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाहन संशोधन आणि विकास संस्था व्हेइकल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (व्ही.आर.डी.ई.) अहमदनगर चीफ इन्स्पेक्टरेट ऑफ मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट एस्टाब्लिशमेंट (एम.टी.ई.) ही लष्करी वाहनांबाबत कार्य करणारी संस्था, स्वातंत्र्यापूर्वी चकलाला या ठिकाणी होती. ते ठिकाण पाकिस्तानात गेल्यामुळे ती संस्था महाराष्ट्रात अहमदनगर येथे आणण्यात आली. नंतरच्या काळात तिचे नामकरण व्हेइकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (व्ही.आर.डी.ई.) असे करण्यात आले. | १९६५ मध्ये आवडी येथे अवजड वाहन निर्मिती कारखाना काढण्यात येऊन तिथे विजयंता रणगाड्याचे उत्पादन सुरू करण्यात आले. त्यात साहाय्यक म्हणून व्ही.आर.डी.ई. चा संशोधन व विकास विभाग तिथे स्थापन करण्यात आला. १९७६ साली या विभागाची व्ही.आर.डी.ई. पासून पूर्ण फारकत करण्यात येऊन, तो विभाग डी.आर.डी.ई. असे त्या विभागाचे नवे नामकरण करण्यात येऊन, फक्त रणगाडेच नव्हे तर सर्वच लढाऊ चिलखती वाहनांच्या संशोधन- विकासाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली. काँबॅट व्हेइकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (सी.व्ही.आर.डी.ई.) ही प्रयोगशाळा संरक्षण खात्याच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डी.आर.डी.ई.) च्या अखत्यारीतील एक महत्त्वाची संस्था आहे. रणगाडे व इतर चिलखती वाहने यांबाबत संशोधन आणि विकास करणारी ही संस्था चैन्नई शहराजवळ आवडी या ठिकाणी आहे. सी.व्ही.आर.डी.ई. ने भारतीय लष्करासाठी अर्जुन हा रणगाडा, अर्जुनच्याच ढांचावर आधारित स्वयंचलित तोफखाना असणारा भीम हा रणगाडा; तसेच टी- ७२ या जुन्या रणगाड्याचा नवा सुधारित अवतार अजेय यांची निर्मिती केली आहे. शिवाय चिलखती मोटारी, तोफगोळे वाहून नेणारी चिलखती वाहने, लष्करी उपयोगासाठी बांधले जाणारे रस्ते-पूल यांच्या बांधणीसाठी उपयुक्त अशी मालवाहू चिलखती वाहने इत्यांदीचीही निर्मिती केली आहे. विकसित तंत्रज्ञान संरक्षण संस्था 'डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डी.आय.ए.टी.) दापोडी, पुणे | पुण्याला खडकी येथे भारतीय सेनादलांसाठी लागणाच्या दारुगोळ्याचा फार मोठा कारखाना आहे. तिथून जवळच दापोडी या ठिकाणी ‘कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग' (सी. एम.ई.) ही संस्था आहे. तिच्या विस्तीर्ण आवारातच १९५२ साली इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट स्टडीज् (आय.ए.एस.) या संस्थेच्या संरक्षण खंड | ५८९ शिल्पकार चरित्रकोश