पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याप्रमाणे प्रत्यक्ष उत्पादनासाठी आयुधनिर्माण कारखान्यांना संबंधित तंत्रज्ञान हस्तांतरित करणे; उत्पादनात आवश्यक ते साहाय्य करणे; उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवून उत्पादनाचा दर्जा उत्तम राहील हे पाहणे, हे सर्व ए.आर.डी.ई.च्याच अखत्यारीत येते. भारतीय सेनादले खूपशी शस्त्रास्त्रे परकीय राष्ट्रांकडून विकतही घेतात. ही परदेशी शस्त्रास्त्रे आणि त्यांची कार्यशैली यांचा सेनादलातल्या वर्तमान शस्त्रास्त्रांच्या प्रणालींशी मेळ घालणे व त्या सर्वांचा उत्तम समन्वय राखणे, हेही कार्य ए.आर.डी.ई. करीत असते. सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सी.एम.ई.) पुणे । दुसरे महायुद्ध चालू असतानाच १९४३ साली उत्तर प्रदेशात (आता उत्तराखंड प्रांतात) स्कूल ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग' (एस.एम.ई.) काढण्यात आले. लष्करी अधिका-यांना रणांगणावरील अभियांत्रिकीचे ज्ञान देणे, हा त्याचा हेतू होता. यापूर्वी हे शिक्षण ब्रिटनमध्ये रॉयल स्कूल ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग या ठिकारी देण्यात येत असे. १९३४ ते १९४३ या कालखंडात खडकी याच ठिकाणच्या थॉम्पसन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये हे शिक्षण देण्यात आले. १९४३ साली रीतसर एस.एम.ई. ची निर्मिती झाली. तरी प्रशिक्षणासाठी एस.एम.ई. थॉम्पसन कॉलेजवरच अवलंबून होते. १९४८ साली एस.एम.ई. पुण्यात खडकीजवळ दापोडी येथे हलवण्यात आले. नोव्हेंबर १९५१ मध्ये त्याचा दर्जा ‘स्कूल' पासून कॉलेज' वर आणण्यात आला. एस.एम.ई. आता सी.एम.ई. झाले. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स ही संस्था देशभरातल्या अभियांत्रिकी शिक्षणाचे सूत्रसंचालन करते. या संस्थेने सी.एम.ई. मधील पदवी अभ्यासक्रम प्रमाणित केला. सी.एम.ई मध्ये भूदलाचे अधिकारी किंवा लष्करी अभियांत्रिकी दलातील अधिकारी दर्जाच्या खालील दर्जाचे कर्मचारी; नौदल, वायुदल; निमलष्करी दलाचे कर्मचारी, पोलिस इतकेच नव्हे, तर सामान्य नागरिकांनाही लष्करी अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यात येते. भारताच्या मित्रराष्ट्रांच्या म्हणजे नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव यांच्या लष्करातील व्यक्तींनाही इथे शिक्षण मिळू शकते.बी.टेक व एम.टेक या पदव्यांसाठी हे कॉलेज दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला (जे.एन.यू.) संलग्न असून, इथले अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ व अ.भा.तंत्रशिक्षण संस्था यांनी प्रमाणित केलेले आहेत. ५८८ / संरक्षण खंड शिल्पकार चरित्रकोश