पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट - ५ संरक्षण विषयक संस्था शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था । आर्मामेंट रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (ए.आर.डी.ई.) पाषाण, पुणे । | आममिंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (ए.आर.डी.ई.) ही संस्था पुणे येथे कार्यरत आहे. संरक्षण खात्याच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डी.आर.डी.ओ.) या संस्थेची ए.आर.डी.ई. ही प्रमुख प्रयोगशाळा असून, तिथे पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या विकासाबाबत संशोधन चालते. | शस्त्रास्त्र निर्मिती क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून १९५८ साली ए.आर.डी.ई.ची सुरुवात करण्यात आली. खडकी, पुणे येथील दारुगोळा कारखान्याच्या आवारातच अगदी प्राथमिक स्थितीत ए.आर.डा.इ.ची श्रीगणेशा झाला. खडकी दारुगोळा कारखान्याच्याच तांत्रिक विकास आस्थापनामधून व मध्य प्रदेश, जबलपूरच्या तशाच आस्थापनातून काही व्यक्तींना ए.आर.डी.ई. कडे वर्ग करण्यात आले. १९६६ साली ए.आर.डी.ई. खडकीहून पुण्याच्याच परिसरातील पाषाण या ठिकाणी आणण्यात आली. सध्या ती तिथेच आहे. तिच्या शेजारीच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही महत्त्वाची प्रयोगशाळा आहे. भारतीय सेनादलांसाठी पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या रचनेत व निर्मितीत सतत अद्ययावता राखणे, हे ए.आर.डी.ई. चे मुख्य काम आहे. तंत्रज्ञानात सतत संशोधन करून नवनवीन नमुने बनवणे, त्यांच्या कठोर चाचण्या घेऊन त्यांचे मूल्यांकन करणे व त्याबरहुकूम उत्पादन करण्यासाठी आयुधनिर्मिती कारखान्यांना त्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करणे, असे या कामातले विविध भाग आहेत. यात पुन्हा मूलभूत संशोधन व प्रत्यक्षोपयोगी संशोधन, नमुना निर्मिती व आवश्यक ते सॉफ्टवेअर बनवणे इत्यादी उपविभाग आहेतच. | आपल्या सेनादलाच्या वापरामध्ये विविध प्रकारची शस्त्रास्त्रे असतात. आपल्या शत्रूच्या तुलनेत वरचढ राहायचे असेल, तर जी शस्त्रास्त्रे सध्या सेनादलाच्या वापरात आहेतच, त्यांचे सतत अद्ययावतीकरण करीत राहणे व त्याद्वारे त्यांचे आयुष्य वाढेल असे पाहणे आवश्यक असते. तेव्हा हादेखील ए.आर.डी.ई. च्या कामाचाच एक भाग आहे. मात्र ए.आर.डी.ई. ही प्रयोगशाळा आहे, उत्पादन कारखाना नव्हे. त्यामुळे शस्त्रास्त्रांचे परिपूर्ण असे नमुने बनवणे; संरक्षण खंड | ५८७ शिल्पकार चरित्रकोश