पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असे क्लासचे नामकरण केले. या संस्थेमध्ये एन.डी.ए., सी.डी.एस. आणि संरक्षणविषयक इतर अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर हत सुंदरी, व्यापारी जहाज वाहतूक यांसारख्या क्षेत्रांत प्रवेश करू इच्छिणा-यांना इथे मार्गदर्शन मिळते. | आतापर्यंत चार हजारांवर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. याशिवाय वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या, आकाशवाणी इत्यादी माध्यमांतून 'डिफेन्स करिअर इज द बेस्ट ऑप्शन' या विषयावर त्यांनी विचार मांडले आहेत. अनेक शाळा-महाविद्यालये व सामाजिक संस्थांतून सुरेश वंजारी यांनी तरुणांना याच विषयावर मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रशिक्षणातून सातत्याने, दरवर्षी ३० ते ३५ विद्यार्थी संरक्षणदलात ऑफिसर म्हणून निवडले जातात. सर्वांत जास्त म्हणजेच ५६ विद्यार्थी २००६ या वर्षी विविध अभ्यासक्रमांसाठी निवडले गेले आहेत. १९९३ ते २०१० या कालावधीत ‘सी.व्ही.ए.'मधून प्रशिक्षण घेतलेले साडेतीनशेच्यावर विद्यार्थी सध्या सैन्यात विविध पदांवर काम करीत आहेत, त्यांत ४२ मुली आहेत. बोइसर मिलिटरी स्कूल (ठाणे-तारापूर), रायगड मिलिटरी स्कूल (महाड), एकलव्य चॅरिटेबल ट्रस्ट यांचे ते संस्थापक विश्वस्त आहेत. त्याशिवाय अनेक सामाजिक संस्थांच्या कार्याशी ते निगडित आहेत. टोपीवाला व्याख्यानमाला, कोकणस्थ ब्राह्मण सभा, क-हाडे ब्राह्मणसभा, मन:शक्ती केंद्र इत्यादी अनेकांनी त्यांचा सन्मान केला आहे. ‘वीरकुमार दोशी', चेंबूर वैभव', 'जनरल अरुणकुमार वैद्य' अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. - अनुराधा गोरे ५७६ / संरक्षण खंड शिल्पकार चरित्रकोश जरा - - -