पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परंतु ते गणित आणि सायन्स या विषयापुरते मार्गदर्शन असे. तेदेखील त्यांनी स्वयंअभ्यास करावा याची जाणीव करून देऊन त्यांना येणा-या अडचणींचे निराकरण करीत असत. परीक्षेच्या आधी महत्त्वाच्या सूचनाही देत असत. आमचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण वर्षभर चालत असे. दर दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांच्या खेळांच्या स्पर्धा असायच्या. त्याचे आयोजन मुले स्वत:च करायची. दर सहामाही एकदोन मुले आरआयएमसी, एनडीएन, आयएमए वगैरे साठी निवडली जायची. त्यावेळी या यशस्वी मुलांचा व त्यांच्या पालकांचा निवृत्त सेनाधिका-याकडूनच सत्कार केला जात असे. त्याच समारंभात खेळांच्या स्पर्धात विजयी झालेल्यांचा बक्षिस समारंभ पण व्हायचा. या समारंभाचे आयोजन पण मुलेच करत असत. अशा त-हेने आमच्या प्रशिक्षण वर्गात स्वयंविकासावरच जास्त भर दिला जायचा. | | वंजारी, सुरेश केशव वि भूसेना - कॅप्टन संरक्षण क्षेत्रासाठी योगदान | सुरेश केशव वंजारी यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण साता-यातील प्रसिद्ध न्यू इंग्लिश शाळेत झाले. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी पुढील शिक्षण घेतले. १९६३ मध्ये शॉर्ट सर्व्हिस (इमर्जन्सी) कमिशन घेऊन ते सैन्यदलात दाखल झाले. त्यांची प्रथम आसाम व मग पंजाबात नियुक्ती झाली. त्यांच्याकडे रस्ते बांधणे, सैन्यदलाला राहण्यासाठी जागा बांधणे हे काम प्रामुख्याने होते. | १९६८ मध्ये सेवाकाल संपल्यावर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील माझगाव डॉक लि., मुंबई येथे ते रुजू झाले. त्यांनी सामग्री व्यवस्थापक, प्रशासकीय व्यवस्थापक अशा विविध पदांवर काम केले. | माझगाव डॉक व्यवस्थापन विकास केंद्र, राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थान, रायगड सैनिकी शाळा इत्यादी अनेक ठिकाणी त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले. अगदी प्रथम राहत्या घरीच त्यांनी स्वत:च्या नातेवाइकांनाच सैन्यदलांत जाण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यात यश मिळताच इतरांनी विचारणा केली. मग संख्या वाढत गेली, तरी स्वरूप छंदाचे होते. फी आकारली जात नव्हती. १९९३ मध्ये जवळजवळ ५० विद्यार्थ्यांनी सशुल्क मार्गदर्शनाची विचारणा केली. फी कळल्यावर केवळ पाच उरले. १९९५ पासून मात्र त्यांचे पूर्णपणे मार्गदर्शनाचे काम सुरू झाले. अगदी घराच्या 'गुरुकुल' नावाला शोभेसे असे येथील वातावरण आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनीच ‘कम्प्लीट व्हिक्टरी अॅण्ड अचीव्हमेंट' (सी.व्ही.ए) संरक्षण खंड / ५७५ शिल्पकार चरित्रकोश