पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रानडे शरद गजानन संरक्षण क्षेत्रासाठी योगदान | भारतीय सैन्यात अधिकारी पदावर मराठी व्यक्ती फारशा आढळत नाहीत सैन्यातील नोकरीविषयी गैरसमजामुळेच ही परिस्थिती आहे. त्यामुळेच मराठी युवकाचे आणि सैन्याचे समीकरण जुळणे दुरापास्तच ठरते. मराठी युवकांनी देशसेवेमध्ये मागे राहू नये, सैन्यदलातील मानाच्या अधिकाराच्या जागा भूषविण्याची संधी महाराष्ट्रातील युवकांना मिळावी या हेतूने पुण्यातील रानडे दांपत्याने गेली १९ वर्षे कसलीही आर्थिक अपेक्षा न ठेवता विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन देण्याचे काम केले. या त्यांच्या विनामूल्य प्रशिक्षण शिबिरातून बाहेर पडलेले १०० अधिकारी देशसेवेत रुजू आले आहेत. शरद गजानन रानडे आणि मंगला शरद रानडे असे या दांपत्याचे नाव असून दोघेही सत्तरीच्या पुढे आहेत. सैन्यदलाच्या सर्व प्रशिक्षण संस्थामध्ये भरती होण्यासाठी पूर्वपरीक्षा आणि मुलाखत देऊन त्यात यशस्वी होणे अनिवार्य असते. त्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे प्रशिक्षण, लेखी परीक्षेची तयारी करून घेण्याचे काम रानडे दांपत्य करते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे सर्व प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते. मात्र एकत्र अट असते ती म्हणजे सैन्यात नोकरी करण्याची विद्यार्थ्याची मनापासून तयारी हवी त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेण्याची चिकाटी हवी. रानडे यांचा जन्म व शिक्षण दोन्ही महाराष्ट्रातच झाले. महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीच्या निमित्याने ते महाराष्ट्राबाहेर गेले. केंद्र सरकारच्या नोकरीत असताना बहुतेक वास्तव्य दिल्ली आणि उत्तर भारतात झाले. त्याच काळात भारतीय सैन्यातील. मराठी अधिका-यांच्या उणीवेली त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली. तेव्हाच त्यांनी मनाशी निश्चय केला की सेवानिवृत्तीच्या काळात मराठी मुलांमध्ये या विषयाची जागरूकता निर्माण करून त्यांना सैन्यात अधिकारी होण्याकरिता मार्गदर्शन करण्याचे समाजकार्य करावे. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पुण्यात डहाणूकर कॉलनीत स्थायिक होऊन वरील कामास रानडे यांनी सुरुवात केली. सुरुवातीस विविध कार्यक्रमामध्ये या विषयी भाषणे व्याख्याने देत असताना त्यांना जाणवले की, नुसत्या व्याख्यानाने हे कार्य होत नाही. मग त्यांनी जवळपासच्या मुलांना गाठून, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना व त्यांना पटवून मुले गोळा करण्यास सुरुवात केली. हे मार्गदर्शन विनामूल्य असल्याने त्यांच्या सोसायटीतंत्र. हे वर्ग घेण्याची परवानगी मिळाली. वर्ग संपल्यावर डहाणूकर कॉलनीतीलच मोकळ्या जागे *** मुळांचे सांघिक खेळ, व्यायाम वगैरेही घेणे त्यांनी सुरु केले. वर्गात ते मुलांना व्याख्यान देण्याचा सराव, समूह चर्चा, मुलाखतीचा सराव, सकारात्मक दृष्टीकोनाबद्दल मार्गदर्शन अशा प्रकारे तयारी करून घेत असत. तसेच रोजचे वर्तमानपत्र, नियतकालीके, साप्ताहिक वगैरे मुलांकडून वाचून घ्यायचे. लेखी परीक्षेविषयी पण मार्गदर्शन दिले. ५७४ / संरक्षण खंड शिल्पकार चरित्रकोश गा । रामशरण