पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दामले शिवरामपंत कॅप्टन - १५ एप्रिल १९०० - २५ जुलै १९७७ मुख्य नोंद - क्रिडा खंड पुणे येथील अनेक नावाजलेल्या क्रीडा संस्थांपैकी एक महाराष्ट्र मंडळ, शिवरामपंत दामले या आसामीने हे मंडळ उभारले इ. स. १९०० मधल्या हनुमान जयंतीच्या दिवशी जन्मलेल्या शिवरामपंतांचे शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालय, तर महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे येथे झाले. दामले कुटुंबीय मुळचे रत्नागिरीतील कोळंबे गावचे. परंतु वडिलांसमवेत ते व कुटुंब पुणे परिसरात आणि नंतर पुण्यातील सदाशिव पेठेतील निबांळकर तालमीच्या परिसरातील वाड्यात वास्तव्यास आले. पावसाळ्यातील लकड़ी पुलावरून मुठेच्या पुरात उड्या मारून ओंकारेश्वरापर्यंतचे अंतर वेगाने कापत जाणे हा त्यांचा छंद होता. | हळूहळू त्यांचा मित्र परिवार वाढत होता. दामल्यांनी आपल्या चार मित्रांसमवेत भारतीय खेळांचा प्रसार करण्याच्या हेतूने १९२७ साली महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. या कार्यात धर्मवीर भालाकार' ल.ब.भोपटकर यांनी मोलाची मदत त्यांना केली. मंडळाचे कार्य वाढत होते. अनेक तरूण मंडळात समाविष्ट होत होते. याच काळात दुस-या महायुद्धाला तोंड फुटले. तरूणांनी सैन्यात सामील व्हावे या हेतूने शिवरामपंतांनी तरूणांना आवाहन केले. या आव्हानास चांगला प्रतिसाद समाजाकडून मिळत होता. परंतु स्वतः सैन्यात नसताना लोकांना सैन्यात भरतीचे आवाहनाचा उद्योग हे करतात अशी टिका लोकांमधून व्हायला लागली. याला उत्तर त्यांनी कृतीतून देण्याचे ठरविले आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ते सैन्यात दाखल झाले. सैन्यात विविध जबाबदा-या यशस्वीपणे पार करत ते कॅप्टन पदावरून निवृत्त झाले. या काळात मंडळाची जबाबदारी त्यांच्या मित्रांनी यशस्वीपणे पार पाडली. सैनिकी सेवेत असताना त्यांना इंग्रजीचे महत्त्व जाणवले. त्यामुळे आपण एक इंग्रजी माध्यमाची शाळा महर्षीनगर पुणे येथील जमीन महाराष्ट्र मंडळास दिली. तेथे शिवरामपंतांनी १९५५ मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. या कालावधीत अनेक समाजोपयोगी उपक्रमांची सुरूवात मंडळात शिवरामपंतांनी केली. जसे क्रीडा कार्यकर्ते तयार करणारा मोफत शारिरीक शिक्षण वर्ग, सेंट जॉन ऍम्बुलन्सचा प्रथमोपचार वर्ग, रायफल शूटिंग रेंज, धर्मार्थ दवाखाना, अखिल महाराष्ट्र शारिरीक शिक्षण परिषद स्थापना त्यांनी केली. शारिरीक शिक्षणाची गरज आणि महत्त्व जाणून १ जुलै १९७७ साली त्यांनी चंद्रशेखर आगाशे हे शारिरीक शिक्षण देणारे पहिले महाविद्यालय सुरू केले. तत्कालीन सनातनींचा विरोध पत्करून मुलींना पोहण्याचे प्रशिक्षण प्रथमतः महाराष्ट्र मंडळात त्यांनी दिले. संरक्षण खंड / ५७३ शिल्पकार चरित्रकोश