पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांनी हिंदी व संस्कृतचा अभ्यास केला, तसेच खूप रुची असल्यामुळे त्यांनी भारतीय संगीत व कथ्थकली नृत्याचाही अभ्यास केला. हिंदी, संस्कृत व मराठी भाषा त्यांनी चांगल्या आत्मसात केल्या. ती एक परमवीरचक्र प्रतिभासंपन्न चित्रकार होती. तिने चितारलेल्या अनेक कलाकृतींमध्ये हिंदू तत्त्वज्ञान व वेदांतील मूल्ये प्रतीत होतात. रामकृष्ण मिशनच्या सामाजिक कार्यामध्ये तिने हिरीरीने भाग घेतला. तसेच सेनादलातील जवानांच्या व त्यांच्या कुटुंबीयांसाठीच्या कल्याणकारी प्रकल्पांत, तिने काम केले. 'उत्तर-भारत फ्लाईंग क्लब'मध्ये भाग घेणारी, ती पहिली स्त्री होती. उदय शंकर यांच्याकडूनही तिने नृत्याचे धडे घेतले. तिने लिहिलेल्या पुस्तकांमध्ये संस्कृत डिक्शनरी ऑफ नेम्स्’, ‘सेंटस् ऑफ महाराष्ट्र' आणि तिच्या अप्रकाशित आत्मचरित्राचे दोन खंड यांचा समावेश आहे. | दधिची ऋषींनी 'वज्र' या अमोघ अस्त्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले. शत्रूचा नाश करण्यासाठी बनवलेल्या या अस्त्रामध्ये, त्यांच्या मांडीच्या हाडाचा वापर केला होता. सावित्रीबाईंनी पदकाच्या रचनेमध्ये वज्राच्या जोडीचा वापर केला. प्रत्येक बाजूला शिवाजीची भवानी तलवार चित्रित केली. तिच्या रचनेस मान्यता मिळाली. अशा प्रकारे ‘परमवीर चक्र' पदक आकारास आले. पहिल्या ‘परमवीरचक्राने सन्मानित झालेले कुमाऊँ पलटणीतील मेजर सोमनाथ शर्मा हे सावित्रीबाईंच्या मुलीचे दीर होते. १९४७-४८ च्या भारत - पाकिस्तानमधील ‘काश्मीर' युद्धात दाखवलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला. परमवीरचक्राचा हा पहिला मानकरी त्यांचा नातेवाईकच असेल, हे त्यांनी स्वप्नातही कल्पिले नसेल. | मेजर जनरल विक्रम खानोलकर यांच्या १९५२ मध्ये झालेल्या निधनानंतर सावित्रीबाईंनी रामकृष्ण मठामध्ये संन्यासाश्रम स्वीकारला. पुढील जीवन त्यांनी संन्यासीनी म्हणून व्यतित केले. - संपादित संदर्भ : १. मेजर जनरल कारडोझो, इयान, अनुवादक- लेले ज्योत्स्ना परमवीरचक्र - रणांगणावरील आपले महान योद्धे'; एप्रिल २००८, | । २. http://www.tribuneindia.com/1999/99june20/sunday/head2.htm ५७२ / संरक्षण खंड शिल्पकार चरित्रकोश सातारा