पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट - १ खानोलकर, सावित्री विक्रम परमवीरचक्राची निर्माती २० जुलै १९१३ - २६ नोव्हेंबर १९९० युद्धामधील शौर्यासाठी देण्यात येणा-या ‘परमवीरचक्र' या पदकाची निर्मिती एका स्त्रीने केली आहे! शत्रूबरोबर लढताना दाखविलेल्या शौर्याबद्दल देण्यात येणा-या सर्वोच्च पदकाची रचना करण्याची जबाबदारी स्वातंत्र्याप्राप्तीनंतर लगेचच, अॅडज्युटंट जनरल, मेजर जनरल हिरालाल अटल यांनी, सौ. सावित्री खानोलकर यांच्यावर सोपविली. सौ. खानोलकरांचा संस्कृत व वेदान्ताचा गाढा अभ्यास होता व त्यांना भारतीय पौराणिक कथांबद्दल सखोल माहिती होती. सौ. खानोलकरांची, रचनाकार म्हणून केलेल्या निवडीमुळे, पदकांच्या निर्मितीत भारतीय शैली प्रतिबिंबित होईल, असे त्यांना वाटले. सावित्रीबाई चित्रकार व कलाकारही होती. मेजर जनरल विक्रम खानोलकरांची ती पत्नी होती. भारतीय पौराणिक कथांबद्दल तिला असलेली ओढ आणि तिच्यातील एका कलाकाराची प्रगल्भता यांमुळे ह्या पदकाची निर्मिती करण्यासाठी तिची केलेली निवड अत्यंत समर्पक ठरली. तिने जे ‘पदक' निर्माण केले, ते खरोखरच उत्कृष्ट आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावित्रीबाई जन्माने भारतीय नव्हत्या. तिची आई रशियन व पिता हंगेरियन होते. ‘इव्हा ह्योन्ने लिन्डा मादे दी मारोस' हे तिचे मूळ नाव होते. तिचा जन्म स्वित्झर्लंडमध्ये झाला. इव्हाला लहानपणापासून भारताचे व सर्व भारतीय गोष्टींचे आकर्षण होते. हिवाळी खेळांचे आकर्षण असलेली ती एक अतिशय धडाडीची व सुंदर मुलगी होती. | १९२९ च्या हिवाळ्यात, चार्गोनिक्स येथे स्कीईंग करत असताना, तिची ‘सिख रेजिमेंट' मधील विक्रम खानोलकर या सँडहर्स्टमध्ये सैनिकी शिक्षण घेणा-या तरुणाशी गाठ पडली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले, पण आई - वडिलांच्या विरोधाची धार बोथट व्हायला, दोन वर्षांचा काळ लागला. | १९३२ मध्ये इव्हा हिंदुस्थानात आली. तिने हिंदू धर्म स्वीकारला व कॅप्टन विक्रम खानोलकर, ह्या उमद्या तरुणाबरोबर तिचा विवाह झाला. तिला भारताचे आकर्षण होतेच. त्यामुळे इथल्या चालीरीती तिने लगेचच आत्मसात केल्या व सेनादलातील अधिका-याची पत्नी म्हणून लगेचच रुळली. सावित्रीबाई खानोलकर यांच्यावर हिंदू तत्त्वज्ञानाचा विलक्षण पगडा होता. पाटणा विद्यापीठात संरक्षण खंड | ५७१ शिल्पकार चरित्रकोश