पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिंगे, वैजनाथ तुलसीराम संरक्षण खंड शहाणे, शिवाजी वासुदेव वायुसेना - ब्रिगेडियर वीरचक्र १५ जून १९२० | शिवाजी वासुदेव शहाणे यांचा जन्म नागपूर येथे झाला. दि. १ डिसेंबर १९४१ रोजी ते वायुसेनेत दाखल झाले. ते आर्टिलरी रेजिमेंटमध्ये मेजर होते. दि. १४ डिसेंबर १९४८ रोजी बतोत आणि बागसार इथे असलेले शत्रूचे तळ शोधून काढण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. लगेच विमान घेऊन मेजर शहाणे कामगिरीवर निघाले. शत्रुपक्षाच्या भूभागावर हवाई टेहळणी करत असताना त्यांच्या विमानाला विमानविरोधी हल्ल्याला सामोरे जावे लागले. मात्र स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्यांनी शत्रूचा तोफख़ाना शोधून काढला आणि त्यावर मारा केला. टेहळणी करणे कठीण झाल्यामुळे ते परत फिरले आणि पडताळा घेण्यासाठी पुन्हा हवाई निरीक्षण करू लागले. शत्रूच्या विमानवेधी तोफांनी त्यांच्रावर मारा सुरू केला; परंतु त्यांनी तो निकामी केला. नंतर शहाणे यांनी शत्रूच्या तोफांचे अन्य दोन तळ शोधून काढले. अशा प्रकारे आपल्या निर्भयतेने, धडाडीने व चिकाटीने दर्शविलेल्या हवाई कौशल्याने त्यांनी शस्त्रविहीन विमानातूनही आपले उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले. शिंगे, वैजनाथ तुलसीराम वायुसेना - पॅराटूपर वीरचक्र २८ जानेवारी १९४२ | वैजनाथ तुलसीराम शिंगे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील नागराळ या गावात झाला. वयाच्या अठराव्या वर्षी म्हणजे दि. २८ जानेवारी १९६२ रोजी ते सैन्यात रुजू झाले. | दि. ११ डिसेंबर १९७१ च्या रात्री पॅराट्रपर वैजनाथ शिंगे पॅराशूट रेजिमेंटच्या रॉकेट लॉन्चर तुकडीमध्ये कार्यरत होते. ही तुकडी पूर्व क्षेत्रामध्य संरक्षणाचे काम करत होती. सदर तुकडी आपल्या कामगिरीच्या जागी हजर झाली. तेथेच त्यांना शत्रूचे सैन्य दिसले. पॅराट्रपर शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता, शत्रुसैन्य सावध होण्याअगोदरच शत्रूच्या वाहनांवर गोळीबार केला. यामध्ये शत्रूसैन्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि २३ शत्रूसैनिकांना कंठस्नान घातले गेले. शिंगे जिथे दबा धरून बसले होते, त्या आघाडीच्या खंदकासमोर त्यांच्या तुकडीचे कमांडर अचानक जखमी होऊन पडले. त्या वेळी शिंगे यांनी आपल्या प्राणांची शिल्पकार चरित्रकोश । श ५६०