पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड शिंदे, शांताराम रामचंद्र पर्वा न करता खंदकातून बाहेर येऊन कमांडरना सुरक्षित ठिकाणी नेले. या वेळी शत्रूच्या एका गोळीने त्यांचा वेध घेतला. परंतु तशाच जखमी अवस्थेत शत्रूला पूर्णपणे परतवून लावेपर्यंत आपल्या जागेवर अढळ राहून त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. त्यांच्या या पराक्रमासाठी त्यांचा 'वीरचक्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. शिंदे, अशोक प्रतापराव वायुसेना - स्क्वॉड्रन लीडर वीरचक्र ३ डिसेंबर १९३६ अशोक प्रतापराव शिंदे यांचा जन्म पुणे येथे झाला. दि. ७ फेब्रुवारी १९५९ पासून त्यांनी भारतीय वायुसेनेत सेवा करण्यास सुरुवात केली. । पाकिस्तान युद्धादरम्यान डिसेंबर १९७१ मध्ये अशोक शिंदे यांनी आपल्या भूसेनेच्या मदतीसाठी आखण्यात आलेल्या अनेक मोहिमांत भाग घेतला. यांतील दोन प्रसंगी त्यांच्यावर छांब-जौरी यां भागांतील शत्रूची आगेकूच थोपवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या हल्ल्यांदरम्यान त्यांच्यावर विमानविरोधी तोफांनी जबरदस्त मारा चालवला होता. अशा वेळी आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांनी आपल्या तुकडीचे नेतृत्व करत शत्रूचे सात रणगाडे आणि २७ वाहने नष्ट केली. ही कामगिरी परिणामकारक ठरली व त्या विभागात आपल्या सैन्यावरील दबाव कमी करण्यात यश मिळाले. | या मोहिमेदरम्यान अशोक शिंदे यांनी धाडस, जिद्द आणि नेतृत्वगुणांचे अत्युच्च प्रदर्शन घडविले. या कामगिरीबद्दल त्यांना दि. १७ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिंदे, शांताराम रामचंद्र भूसेना - हवालदार वीरचक्र १५ जुलै १९४० - १७ नोव्हेंबर १९६५ शांताराम रामचंद्र शिंदे यांचा जन्म रत्नागिरी तालुक्यातील हवेली या खेड्यात झाला. दि. १६ जुलै १९५७ रोजी वयाच्या सतराव्या वर्षी ते सैन्यात दाखल झाले. युद्धविरामानंतरही राजस्थानच्या भागामध्ये घुसखोरी करणा-या शत्रूचा बीमोड़ करणाच्या तुकडीचे नेतृत्व हवालदार शांताराम शिंदे करीत होते. आपल्या निश्चित लक्ष्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी शत्रूकडील प्रचंड शस्त्रे आणि स्वयंचलित बंदुका श । शिल्पकार चरित्रकोश ५६१