पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड शर्मा, सतीशचंद्र डी. शर्मा, सतीशचंद्र डी. वायुसेना - विंग कमांडर वीरचक्र २१ डिसेंबर १९४८ | सतीशचंद्र डी. शर्मा यांचा जन्म नागपूर येथे झाला. दि. २० डिसेंबर १९६९ रोजी त्यांची वायुसेनेत नियुक्ती करण्यात आली. १९७१ च्या पाकिस्तान युद्धामध्ये फ्लाइंग ऑफिसर सतीश शर्मा पूर्व विभागाच्या ब्रिगेडसोबत होते. शत्रूने वेढा दिलेल्या सिल्हेटवर शर्मा यांनी दि. ७ डिसेंबर रोजी हेलिकॉप्टरने मागच्या बाजूने हल्ला चढविला. शत्रूकडून सातत्याने गोळीबार सुरू होता. | शत्रूच्या या भीषण गोळीबाराची तमा न बाळगता मागून येणा-या हेलिकॉप्टर्सना त्यांनी शत्रूच्या ठिकाणांची अचूक माहिती दिली. त्याचा वापर करून शत्रूची मारा करण्याची क्षमता भारतीय वायुसेनेने नष्ट केली. त्यामुळे शत्रूला दुस-या दिवसापर्यंत गोळीबार करता आला नाही. शत्रूने पुन्हा गोळीबार सुरू केला. त्याला न जुमानता शर्मा यांचे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा आकाशात झेपावले. ते निर्देशित स्थानापर्यंत पोहोचले आणि शत्रूच्या ठिकाणांची योग्य माहिती त्यांनी भारतीय वायुसेनेपर्यंत पोहोचवली. त्यामुळे आपल्या बॉम्बफेकी विमानांना शत्रूच्या ठिकाणांचा वेध घेता आला. । दि. ८ डिसेंबर रोजी शर्मा यांची गाठ शत्रूच्या गस्ती पथकाशी पडली. भूसेनेच्या युद्धाची फारशी कल्पना नसतानाही शर्मा यांनी पुढाकार घेत शत्रूच्या गस्ती पथकावर हल्ला चढविला. त्यांच्या या उत्फूर्त आणि त्वरित कारवाईने शत्रूच्या दोघा अधिका-यांना त्यांनी यमसदनी पाठविले. त्यानंतरही ते शत्रूच्या ठिकाणावर हवाई हल्ले करतच राहिले. त्यामुळे शत्रूची धांदल उडाली. त्यांनी भारतावर हल्ला करण्याच्या उद्देशाने केलेली तयारी पूर्णपणे कोलमडली. फ्लाइंग ऑफिसर शर्मा यांच्या या कामगिरीबद्दल दि. ९ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना वीरचक्र देऊन गौरविण्यात आले. आता ते आग्रा येथे स्थायिक झाले आहेत. श । शिल्पकार चरित्रकोश ५५९