पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड साळुके, लक्ष्मण सिदू आणि त्यामागे लपून गोळीबार करण्यास सुरुवात केली, त्यामुळे सैनिकांना आपले विजयाचे उद्दिष्ट साध्य करता आले. दुस-या दिवशी त्या ठिकाणी शत्रूने मोठा गोळीबार करण्यास प्रारंभ केला. साळवी यांच्या डोक्याला गोळी लागली, तरीही युद्धभूमीवरून परत जाण्यास त्यांनी नकार दिला व ते चिवटपणे बंदूक चालवीत राहिले. या युद्धातील बळीराम साळवी यांच्या अतुलनीय धैर्य व पराक्रमासाठी त्यांना ‘वीरचक्राने गौरविण्यात आले. साळवे, कचरू येडू भूसेना - हवालदार वीरचक्र १५ जानेवारी १९५१ कचरू येडू साळवे यांचा जन्म औरंगाबादमधील सेवर या गावी झाला. दि. १५ जानेवारी १९६९ रोजी ते सैन्यात दाखल झाले. | दि. १० डिसेंबर १९७१ च्या रात्री महार रेजिमेंटने शत्रूच्या शकरगढ़ क्षेत्रातील प्रमुख स्थानांवर वर्चस्व प्रस्थापित केले. परंतु सुरुंग पेरलेल्या या क्षेत्रात अनेक भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. त्यांचे मृतदेह युद्धभूमीवर पडून होते. दिवस उजाडल्यावर लक्षात आले की, त्यांच्यापैकी एक जवान अजून जिवंत आहे. मृतदेहांना तेथून बाहेर काढणे खूप कठीण झाले होते; कारण शत्रूकडून गोळीबार सुरूच होता. अशा स्थितीत तो जखमी जवान आणखी काही काळ तिथेच पडून राहिला असता, तर तो वाचणे कठीण होते. साळवे यांनी ते ओळखून मोठ्या धाडसाने सुरुंगभूमीवर पाऊल ठेवले. त्रांनी एका पाठोपाठ एक मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. शत्रूकडून मध्यम मशीनगनमधून गोळीबार सुरूच होता; मात्र शत्रूच्या बंदुकीच्या मान्याला न जुमानता साळवे यांनी त्या जखमी जवानाला छावणीत सुरक्षित आणण्यात यश मिळवले. या प्रसंगी वालदार साळवे यांनी कमालीची बहादुरी व दृढता दाखवली, त्यासाठी त्यांचा ‘वीरचक्राने सन्मान करण्यात आला. साळुके, लक्ष्मण सिदू भूसेना - सुभेदार मेजर, मानद कॅप्टन वीरचक्र । २३ मार्च १९२२ लक्ष्मण सिदू साळुके यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील बराडे या गावात झाला. दि. २३ मार्च १९४२ रोजी एकोणिसाव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीत ते दाखल झाले. स । शिल्पकार चरित्रकोश ५६७