पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साळवी, बळीराम विठ्ठल संरक्षण खंड सावंत, विनायक भिवाजी वायुसेना - विंग कमांडर वीरचक्र, विशिष्ट सेवा पदक, महाराष्ट्र गौरव पुरस्कार २१ जानेवारी १९३३ - १८ डिसेंबर २००६ विनायक भिवाजी सावंत यांचा जन्म महाराष्ट्रातील अंगणेवाडी या गावात झाला. स्वातंत्र्योत्तर पंचवीस वर्षे भारताला संरक्षणदृष्ट्या युद्धसदृश परिस्थिती व युद्धांची अशी गेली. याच कालावधीत विंग कमांडर विनायक सावंत यांनी वायुसेनेत वेगवेगळ्या अधिकारपदांवर कामगिरी बजावली. एव्हरेस्ट शिखर व त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाच्या तीस हजार फूट उंचीवरील फोटोग्राफी करण्यात सहभाग, अशा प्रकारच्या अनेक प्रतिकूल परिस्थितीमधल्या मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. १९६२ च्या लढाईमधील स्कार्ड, कारगिल ते उत्तर-पूर्व सीमेचा प्रदेश या भागांमध्ये धोका पत्करून शत्रूच्या जागा व भूभागाची टेहळणी करण्याच्या फोटोग्राफी मोहिमेमध्ये सावंत आघाडीवर होते. या मोहिमेमध्ये त्यांनी शत्रूकडील महत्त्वाची माहिती प्राप्त करून घेतली, या कामगिरीबद्दल त्यांना 'वीरचक्र' प्रदान करण्यात आले. १९४८ ते १९७३ हा त्यांच्या वायुसेनेतील कारकिर्दीचा काळ त्यांच्या साहसी कामगिन्यांनी भरलेला होता. अनेक युद्धांमध्ये शत्रूच्या अवघड अशा डोंगराळ सैनिकी भूप्रदेशाची विमानातून टेहळणी करण्याचे काम त्यांनी केले. ही कामगिरी दिवसा व रात्री अशा दोन्ही वेळेस करावी लागत असे. प्रसंगी प्रतिकूल हवामानाला तोंड देऊन विमानचालकाला योग्य दिशादर्शन करण्याचे काम त्यांना करावे लागत असे. अशा अनेक धोकादायक कामगिन्यांची धाडसाने पूर्तता करणे व कौशल्याचा नेमका वापर करणे ह्यामुळे ते सन्मानास पात्र ठरले. साळवी, बळीराम विठ्ठल भूसेना - हवालदार वीरचक्र २ नोव्हेंबर १९१९ | बळीराम विठ्ठल साळवी यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर येथे झाला. दि. २ नोव्हेंबर १९४१ रोजी ते सैन्यात दाखल झाले. महार रेजिमेंटमध्ये कार्यरत राहून त्यांनी मोठे साहस दाखविले. दि. १४ एप्रिल १९४८ रोजी शत्रूने राजौरीवर हल्ला चढवला. साळवी यांच्याकडे पहिल्या कुमाऊं रेजिमेंटला मध्यम मशीनगन पुरवण्याचे काम दिले होते. भारतीय सैनिक शत्रूवर हल्ला करीत पुढे जात असताना शत्रूने उत्तरादाखल त्यांच्यावर गोळीबार करण्यास सरुवात केली. साळवी यांनी मोठ्या चातुर्याने एक मोठा दगड ढकलीत अचूक ठिकाणी आणून ठेवला शिल्पकार चरित्रकोश ५६६