पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुर्वे, अप्पासाहेब दादासाहेब संरक्षण खंड दि. १८ सप्टेंबर १९६५ या दिवशी झामन येथील एक महत्त्वपूर्ण भाग ताब्यात घेण्याची जबाबदारी मराठा रेजिमेंटवर सोपवण्यात आली होती. साळुके त्या वेळी दुस-या फळीत होते. शत्रूने मशीनगनच्या साह्याने जोरदार हल्ला चढवला. लहान शस्त्रांचाही शत्रूकडून मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. त्यामुळे ६० सैनिकांच्या राखीव तुकडीचा वापर करून शत्रूला नेस्तनाबूत करण्याचे आदेश सुभेदार सालुंके यांना देण्यात आले. साळंके यांनी आपल्या सैनिकांना शत्रूवर तुटून पडण्याच्या सूचना दिल्या. सालुंके यांच्यासह सर्व सैनिकांनी प्रयत्नांची शर्थ करून शत्रूच्या सोळा सैनिकांना यमसदनी धाडले, तर नऊ जणांना बंदी केले. शत्रूचे अन्य सैनिक पळून गेले. साळुके यांच्या साहसामुळे सैनिकांना उद्दिष्ट साध्य करण्यात यश आले. साळुके, सदानंद बळवंत भूसेना - कर्नल वीरचक्र । १२ मे १९३७ सदानंद बळवंत साळंके यांचा जन्म धुळे येथे झाला. पुण्यातल्या मॉडर्न विद्यालयामध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतले. पुण्यातल्याच कृषी महाविद्यालयातून त्यांनी कृषी विषयात एम.एस्सी.ची पदवी मिळवली. दि. ३० जून १९६३ रोजी ते लष्करात दाखल झाले. सहाव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीत मेजरपदी असताना त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. १९७१ च्या भारत-पाक युद्धात दि. १० डिसेंबर रोजी शत्रूच्या काही ठिकाणांवर हल्ला करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. मेजर सालुंके यांनी आपल्या सहका-यांसमवेत शत्रूच्या तीन तळांवर ताबा मिळवला. शत्रूकडून जोरदार बॉम्बफेक आणि गोळीबार होत असतानाही ते पुढे-पुढे जात राहिले. आपल्या सहका-यांसमवेत त्यांनी अत्यंत वेगाने शत्रूवर प्रतिहल्ला चढवला आणि आपल्या लक्ष्याचा अचूक भेद केला, मोहीम फत्ते करताना शत्रुपक्षातील अनेक सैनिकांना त्यांनी गारद केले. या मोहिमेत त्यांच्या पुढाकाराचे आणि नेतृत्वगुणांचे प्रदर्शन घडले. सुर्वे, अप्पासाहेब दादासाहेब भूसेना - मेजर वीरचक्र २ जून १९३९ अप्पासाहेब दादासाहेब सुर्वे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिट्री शाळा, तसेच महाविद्यालयीन ५६८ शिल्पकार चरित्रकोश