पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरे, हनुमान कृष्णा संरक्षण खंड दि. ४ डिसेंबरला त्यांनी कोहाटवरील प्रतिहल्ल्यात भाग घेऊन शत्रूच्या विमानतळाचे अपरिमित नुकसान केले. दि. ५ डिसेंबरला शत्रूच्या सकेसर तळावर हल्ला करायची योजना आखली होती. ही कामगिरी लढाऊ विमानांच्या ताफ्यावर सोपवली होती. नेतृत्व करणार होते जाल मिस्त्री. शत्रूने ह्या तळाचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण केलेले होते नि त्याच्याकडून निकराचा जोरदार प्रतिकार होऊ शकत होता. अशा ह्या कठीण कामगिरीवर निघण्याचा तयारीत असतानाच त्यांच्या ताफ्यातील दुसरे लढाऊ विमान अकार्यक्षम झाल्याचे निदर्शनास आले. आयत्या वेळी उपस्थित झालेल्या ह्या अडथळ्याकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. जिवाच्या कराराने, जिद्दीने ते एकटेच कामगिरीवर निघाले. आपल्या लक्ष्याजवळ येताच त्यांनी सकेसरच्या रडार तळावर जोरदार हल्ला चढवला. शत्रूकडून होणा-या जबरदस्त गोळीबाराला भीक न घालता त्यांनी चिकाटीने आपली चढाई निकराने चालूच ठेवली अन् शत्रूच्या ह्या तळाची अपरिमित हानी करून तो तळ निकामी करून टाकला. स्क्वॉड्रन लीडर जाल माणेकशाँ मिस्त्री यांनी अखेरच्या क्षणापर्यंत असीम धैर्य, करारीपणा अन् कामगिरीवरील अभंग निष्ठा यांचे सुंदर दर्शन घडवले. त्यांच्या या पराक्रमाच्या गौरवार्थ दि. ५ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना मरणोत्तर ‘वीरचक्राने सन्मानित केले गेले. मोरे, हनुमान कृष्णा भूसेना - सुभेदार वीरचक्र १ जून १९४८ | हनुमंत मोरे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील भांबे या गावी झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर दि. २१ डिसेंबर १९६८ रोजी पंधराव्या मराठा लाईट इन्फन्ट्री या लष्काराच्या तुकडीत हनुमंत मोरे हे शिपाई म्हणून रुजू झाले. लष्कराच्या या तुकडीला शौर्याची मोठी परंपरा आहे. भारताच्या पश्चिम क्षेत्रात, शिपाई हनुमंत मोरे हे मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या तुकडीसह डिसेंबर १९७१ मध्ये तैनात होते. दि. ९ डिसेंबर रोजी एका चकमकी दरम्यान शत्रूने आपल्या जवानांवर मध्यम पल्ल्याच्या मशिनगनने गोळीबार सुरू केला. त्यामध्ये आपल्याकडे मोठी प्राणहानी झाली. शिपाई मोरे यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शत्रूच्या त्या चौकीवर हल्ला करून त्यावर हातगोळा टाकला. या चकमकीदरम्यान मशिनगनच्या गोळीबारात तेही जखमी झाले. तरीही स्वत:च्या जखमांची तमा न बाळगता, शिपाई हनुमंत मोरे यांनी शत्रूच्याच मशिनगनने पळून जाणा-या शत्रूसैनिकांवर हल्ला करून कित्येकांना यमसदनास पाठविले. या त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना 'वीरचक्र प्रदान करण्यात आले. नंतर त्यांची सुभेदार पदावर बढती झाली. शिल्पकार चरित्रकोश