पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड मिस्त्री, जाल माणेकशाँ माळी, बाबू संतू भूसेना - हवालदार मेजर वीरचक्र ७ जून १९३७ बाबू संतू माळी यांचा जन्म सांगली जिल्ह्यामधील कुडची या गावात झाला. दि. ७ जून १९५७ रोजी ते लष्करात दाखल झाले. ते एअर डिफेन्स रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. हवाई संरक्षण तोफखान्याच्या (एअर डिफेन्स बॅटरी) तुकडीमध्ये असताना हवालदार मेजर बाबू माळी यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धात तोफेद्वारे अचूक वेध घेऊन पाकिस्तानी ‘१०४ स्टार फायटर' हे विमान पाडले. माळी यांचे कौशल्य आणि धाडसासाठी त्यांना दि. ९ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र' देऊन सन्मानित करण्यात आले. मिलन, रॉय जोसेफ भूसेना - कमांडर वीरचक्र २९ एप्रिल १९३४ रॉय जोसेफ मिलन यांचा जन्म मुंबई येथे झाला. आपले सर्व शिक्षण संपल्यावर दि. १ जुलै १९५५ रोजी त्यांनी भारतीय नौदलात सेवा पत्करली. | १९७१ च्या पाकिस्तान युद्धात रॉय मिलन यांची भारतीय नौसेनेच्या पाणबुडीवर प्रमुख अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली होती. ह्या पाणबुडीवर बांगलादेशाच्या सागरी प्रदेशातील गस्तीचे काम सोपविण्यात आलेले होते. शत्रूच्या हवाई दलाची विमाने अन् सागरी पृष्ठभागावरील नौदल रॉय जोसेफ मिलन यांच्या पाणबुडीवर सतत पाळत ठेवून होते. तरीही त्यांनी त्यांचे गस्तीचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे शत्रूलाही त्यांची जरब बसली. या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी कौशल्याची अन् निधडेपणाची नितांत गरज होती. आपल्या या अजोड अन् यशस्वी कामगिरीत त्यांनी अतुलनीय करारीपणा, धैर्य अन् कुशल नेतृत्व दाखवले. त्यांच्या ह्या पराक्रमाच्या गौरवार्थ १९७१ मध्ये त्यांना 'वीरचक्र' प्रदान केले गेले. म मिस्त्री, जाल माणेकशॉ वायुसेना - स्क्वॉड्रन लीडर वीरचक्र २९ डिसेंबर १९३५ | जाल माणेकशॉ मिस्त्री यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांची भारतीय वायुसेनेत नियुक्ती झाली. १९७१ च्या पाकविरोधी युद्धाच्या वेळी स्क्वॉड्रन लीडर जाल मिस्त्री हे भारतीय लढाऊ विमानांच्या ताफ्यातील एक वैमानिक होते. शिल्पकार चरित्रकोश