पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड राईलकर, गंगाधर रंगनाथ राईलकर गंगाधर रंगनाथ वायूसेना - ग्रुप कॅप्टन वीरचक्र ९ ऑगस्ट १९३८ गंगाधर राईलकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील रोहा येथे झाला. पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. दि. २८ मे १९६० रोजी ते हवाई दलात दाखल झाले. फ्लाईट लेफ्टनंटपदावर कार्यरत असताना फोटो रिकॉनिसन्स स्क्वाड्रन (टेहळणी पथक) मध्ये नेव्हिगेटर म्हणून यांच्यावर जबाबदारी होती. १९६५ च्या सप्टेंबर महिन्यात आखण्यात आलेल्या मोहिमेत त्यांनी अनेक जबाबदा-या पार पाडल्या. शत्रूसंबंधात महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी मिळवली. शत्रूवर हल्ला करण्यासाठी अत्यंत कठीण प्रसंगांमध्ये त्यांनी लढाऊ विमानाची भरारी घेऊन बहुमोल कामगिरी बजावली. अनेक मोहिमा त्यांनी पूर्ण केल्या. त्यांनी शत्रुसंबंधात मिळवलेल्या महत्त्वपूर्ण माहितीमुळे मोहिमा आखणे आणि त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे शक्य झाले. राणे, चेरी हासंद वायुसेना - फ्लाइट लेफ्टनंट वीरचक्र १३ मार्च १९४४ - २८ एप्रिल २००९ चेरी हासंद राणे यांचा जन्म मुंबई येथे झाला. दि. ४ जून १९६४ पासून त्यांनी भारतीय वायुसेनेत फ्लाइट लेफ्टनंट म्हणून सेवा करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात, डिसेंबर १९७१ मध्ये फ्लाइट लेफ्टनंट राणे यांनी हुसेनवाला भागातील एका हुवाई हल्ल्याचे नेतृत्व केले व शत्रूचा एक रणगाडा उद्ध्वस्त केला. त्यांनी अशाच प्रकारच्या अनेक मोहिमांचे नेतृत्व केले व त्यांत त्यांना शत्रूच्या हवाई, तसेच जमिनीवरून होणा-या प्रतिकाराचा सामना करावा लागला. शिल्पकार चरित्रकोश ५५३