पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड बनसोडे, धोंडीराम बनसोडे, धोंडीराम वायुसेना - हवालदार वीरचक्र ३० ऑगस्ट १९३९ धोंडीराम बनसोडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भडकांबे या छोट्याशा खेड्यात झाला. दि. ३० ऑगस्ट १९६१ रोजी ते वायुसेनेच्या एकशे एकोणतिसाव्या हवाई संरक्षण फलटणीत दाखल झाले. १९७१ च्या बांगलादेश युद्धात एका लष्करी आस्थापनाचे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी अचूक मारा करून आक्रमणकारी पाकिस्तानी सेबरजेट विमान नष्ट केले. नाईक धोंडीराम बनसोडे यांनी दाखविलेल्या धैर्य आणि उच्चतम व्यावसायिक कौशल्यासाठी दि. ६ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना ‘वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते हवालदार पदावरून निवृत्त झाले. बाजिना, रूसी होरमुसजी भूसेना - ब्रिगेडियर वीरचक्र ३ फेब्रुवारी १९२४ रूसी होरमुसजी बाजिना यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतले. दि. २१ जानेवारी १९४५ रोजी ते सोळाव्या महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले. १९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी सियालकोट क्षेत्रातील मुहादीपूर आणि छानी गावावर शत्रूचे वर्चस्व होते. हा भाग ताब्यात घेण्याचे आदेश बाजिना यांच्या तुकडीला देण्यात आले होते. दि. १८ सप्टेंबर १९६५ च्या रात्री बाजिना यांनी हे ध्येय मोठ्या साहसाने साध्य केले. मुहादीपूर आणि छानी भागाचा भारताने ताबा मिळवला. बाजिना आणि त्यांच्या सहका-यांनी केलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी शत्रूने जोरदार प्रतिहल्ला केला. मात्र बाजिना आणि त्यांच्या सैनिकांनी पराक्रमाची पराकाष्ठा करीत मुहादीपूरमधून शत्रूला हुसकावून लावले. या धुमश्चक्रीत शत्रूचे शंभराहून अधिक सैनिक ठार झाले, तर नऊ जण कैद झाले. दि. १८ सप्टेंबर १९६५ रोजी बाजिना यांना वीरचक्र देण्यात आले. ५४४ शिल्पकार चरित्रकोश