पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड भागवत, बिपीनचंद्र भास्कर भागवत, बिपीनचंद्र भास्कर नौसेना - कमांडर वीरचक्र १२ एप्रिल १९४४ | बिपीनचंद्र भास्कर भागवत यांचा जन्म पुणे येथे झाला. पुण्यातीलच नामांकित एमईएस स्कूल आणि फर्गुसन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. ७ डिसेंबर १९६४ रोजी ते भारतीय नौसेनेत भरती झाले. त्यानंतर सात वर्षांतच पाकिस्तानबरोबरच्या युद्धात कामगिरी बजावण्याची संधी त्यांना मिळाली. १९७१ च्या युद्धात लेफ्टनंट बिपीनचंद्र भागवत हे नौसेनेच्या विमानाचे वैमानिक होते. या विमानातून बांगलादेशमधील बंदरावर सातत्याने हल्ले केले जात होते. शत्रूकडूनही त्यांच्या विमानावर सातत्याने तोफगोळे डागण्यात येत होते. अशा या घनघोर चकमकीत त्यांनी आपल्या अचूक हल्ल्यांद्वारे पाकिस्तानच्या तब्बल तीन युद्धनौका उद्ध्वस्त केल्या. | त्यांच्या हवाई गस्तीचा धसकाच जणू शत्रूने घेतला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण गस्तीमुळे शत्रूची एकही युद्धनौका बंदर सोडून कामगिरीसाठी बाहेर पडू शकत नव्हती. त्याचाच परिणाम म्हणजे सहा डिसेंबर रोजी भारतीय नौसेनेने शत्रूच्या बंदरावर कब्जा मिळविला आणि त्यांच्या युद्धनौकाही ताब्यात घेतल्या. नौसेनेच्या या अतुल्य कामगिरीमध्ये बिपीनचंद्र भागवत यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच १६ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना वीरचक्र हा सन्मान जाहीर करण्यात आला. पुढे त्यांना कमांडर या पदावर बढतीही मिळाली. भारद्वाज, प्रबोधचंद्र एच. भूसेना - कर्नल वीरचक्र २७ नोव्हेंबर १९५० प्रबोधचंद्र एच. भारद्वाज यांचा जन्म महाराष्ट्रातील देवळाली कॅम्प येथे झाला. प्रबोधचंद्र यांचे वडील एच. के. भारद्वाज हे सैन्यात ब्रिगेडियर होते. दि. १४ जून १९७० रोजी भारद्वाज हे सैन्यात दाखल झाले. सैन्यात दाखल होताच त्यांची नेमणूक अमृतसर येथे झाली. तो काळ भारत-पाकिस्तान युद्धाचा शिल्पकार चरित्रकोश ५४५