पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड फराटे, राजाराम कोंडिबा फराटे, राजाराम कोंडिबा भूसेना - हवालदार, मानद नारब सुभेदार वीरचक्र ८ मे १९२३ राजाराम फराटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पिंपळसुनी या गावी झाला. दि. ८ मे १९४५ रोजी त्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीच्या तिस-या पलटणीमध्ये शिपाई म्हणून सेवा करण्यास सुरुवात केली. | शिपाई राजाराम फराटे दि. ६ फेब्रुवारी १९४८ रोजी आपल्या पलटणीसोबत एका पाकिस्तानी छावणीवर हल्ला करण्यास गेले असता शत्रूकडून त्यांच्यावर जबरदस्त प्रतिहल्ला चढविण्यात आला. अशा प्रसंगी आपल्या जिवाची पर्वा न करता शिपाई धाडसाने प्रेरित होऊन त्यांच्या इतर सहका-यांनी सुद्धा शत्रूवर हल्ला चढवला व पाच शत्रूसैनिकांना ठार केले. अशा रीतीने शिपाई राजाराम फराटे यांनी आपल्या सहका-यांसमोर जबरदस्त आत्मविश्वास व शौर्याचे उदाहरण उभे केले. त्याबद्दल शिपाई राजाराम फराटे यांना दि. ६ फेब्रुवारी १९४६ रोजी वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फ । शिल्पकार चरित्रकोश ५४३