पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड परांजपे, दिवाकर अनंत शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला, त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एन.डी.ए.) परीक्षाही त्यांनी दिली. एन.डी.ए.तील शिक्षणानंतर महार रेजिमेंटच्या दुस-या बटालियनमधून त्यांनी कामास सुरुवात केली. १९६५ च्या भारत-पाक युद्धात बावन्नाव्या पलटणीचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. द. सियालकोटमधील मुहादीपूर व चात्नी ही गावे आपल्या ताब्यात घेऊन आपली ठाणी उभी करण्याची कामगिरी या तुकडीने पार पाडली. तत्पूर्वी भल्या पहाटे या तुकडीचे मोर्चेबांधणीचे काम सुरू असताना अचानक शत्रूकडून तोफगोळ्यांचा व बंदुकीतील गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. १९,२० व २१ सप्टेंबर १९६५ हे तीन दिवस सियालकोटमधील फुटबॉल ग्राऊण्डवर दोन्ही सैन्यांची धुमश्चक्री चालली होती. २१ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजता पाक सैन्याच्या हल्ल्याची तीव्रता खूपच वाढली. ह्यांनी आपल्या प्लॅटून कमांडरला दोन इंची उखळी तोफांचा मारा करण्याची सूचना केली. परंतु शत्रूने केलेल्या बॉम्बहल्ल्यात त्यांचा रेडिओसेट व आर.सी.एल. टेलिफोन लाइन पूर्णपणे निकामी झाल्याने हा हल्ला करणे शक्य झाले नाही. | अशा बिकट परिस्थितीत दुस-या तुकडीकडे निरोप पाठवून ह्यांनी त्यांच्याकडील कुमक मागविली. या तुकडीने केलेल्या अचूक व विनाशक मान्यामुळे शत्रूचे अनेक सैनिक जखमी वा मृत झाले आणि त्यांच्याकडील राखीव दारूगोळाही संपुष्टात आला. काही वेळानंतर शत्रूचे सैन्य दोन मोर्चाच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेतून या पलटणीच्या मुख्यालयापर्यंत पोहोचले. या वेळी झालेल्या हल्ल्यात त्यांची जीपही जळून नष्ट झाली. तरीही डगमगून न जाता त्यांनी मुहादीपूरच्या एका टोकास पुन्हा आपल्या जवानांची मोर्चेबांधणी केली, प्रसंगी तेथील घरांचा आसरा घेऊन शत्रूवर हल्ला चढविला व त्यांच्या ताब्यात गेलेले बंकर पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. यानंतर दोन पाकिस्तानी सैनिकी अधिकारी शरणागतीची पांढरी निशाणे घेऊन जीपमधून आले व त्यांनी शरणागती पत्करली. या लढाईनंतर या पलटणीस कालकोट क्षेत्रातील घुसखोरी रोखण्याचे कार्य सोपविले गेले. या युद्धात गाजविलेल्या कामगिरीमुळे त्यांना 'वीरचक्र' हा सन्मान देऊन भूषविण्यात आले. चतलापूरची पाकिस्तानची सीमाचौकी जिंकून घेण्यासाठी रणनीती म्हणून या बटालियनची विभागणी ए, बी, सी व डी अशा कंपन्यांमध्ये केली गेली. या वेळीदेखील ब्रिगेडियर परांजपे यांच्या नेतृत्वगुणांचा कस लागला. चतलापूरच्या सीमा चौकीच्या टेकडीवर ३०-४० सैनिक तैनात होते. चौकीच्या चारही बाजूंना तारेचे कुंपण व पंजी (अणकुचीदार टोक असणा-या बांबूच्या पट्ट्या) लावल्या होत्या. येथील सैन्य चारही बाजूस बारकाईने लक्ष ठेवून होते. शत्रुसैन्याचे जेवण घेऊन येणारे ट्रक्स या पलटणीच्या नजरेस पडले. बरोबरच त्यांच्या संरक्षणासाठी शिल्पकार चरित्रकोश