पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परांजपे, दिवाकर अनंत संरक्षण खंड खास चिलखती गाड्याही होत्या. शत्रुसैन्याच्या या गाफील अवस्थेचा फायदा उठवत या तुकडीने दोन्ही बगलांनी सीमा चौकीवर तुफान हल्ला चढविला. | हा रुद्र अवतार पाहून पाकिस्तानी सैन्याने एम.एम.जी. सारखी भारी हत्यारे तेथेच टाकून पळ काढला. दुपारचे जेवण घेण्याचीही संधी त्यांना मिळू शकली नाही. अशा रीतीने सिल्हेट जिल्ह्यातील या लढाया ब्रिगेडियर परांजपे यांच्या पलटणीने एका पाठोपाठ जिंकल्या. | या प्लॅटूनला या लढाईत एक महावीरचक्र, तीन वीरचक्र, एक विशिष्ट सेवा मेडल, एक सेना मेडल व तीन मेन्शन्ड इन - डिस्पॅचेस ही शौर्यपदके मिळाली. एक एम.एम.जी, दोन एल.एम.जी, १११ रायफली, ३८ स्टेनगन्स व अगणित दारूगोळाही या पलटणीच्या हाती लागला. या संपूर्ण लढाईत कुठेही तोफखाना किंवा रणगाडे अशी भारी युद्धसामग्री उपयोगात न आणता केवळ भूसेनेच्या तुकडीच्या साहाय्याने विजय संपादन केला. हे या लढाईचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. त्यांना पूर्व पाकिस्तान १९७१' हा युद्धकक्ष सन्मान (थिएटर ऑनर) ब ‘समशेर-नगर १९७१' हा युद्ध सन्मान (बॅटल ऑनर) मिळाला. ब्रिगेडियर परांजपे यांनी महू कॉलेज ऑफ कॉम्बॅट येथे (आताचे वॉर कॉलेज) प्रशिक्षक म्हणून, सिंकदराबाद येथे एन.सी.सी.चे डायरेक्टर म्हणून, महू येथे ब्रिगेडियर जनरल स्टाफ म्हणून जवानांना नेतृत्वगुणांचे धडे दिले. पुणे येथूनच दि. ३१ ऑगस्ट १९९४ रोजी ते सेवानिवृत्त झाले. प परेरा, लॉरेन्स फ्रेडरिक वायुसेना - फ्लाइट लेफ्टनंट वीरचक्र १० जून १९४५ - १४ डिसेंबर १९७१ | मुंबईतील वांद्रे येथे लॉरेन्स फ्रेडरिक परेरा यांचा जन्म झाला. आपले शिक्षण पूर्ण करून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी, दि. १ ऑगस्ट १९६४ रोजी लॉरेन्स परेरा भारतीय वायुसेनेत फ्लाइट लेफ्टनंट या पदावर रुजू झाले. १९७१ च्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात फ्लाइट लेफ्टनंट परेरा यांची नियुक्ती अगदी लढाईच्या अग्रभागी होती. लष्कराच्या तुकडीसोबत हवेतून हल्ल्यांचे नियंत्रण करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांच्याकडे शत्रूच्या क्षेत्रातील स्थळांवर जवळून हल्ला करण्यासाठी विमानांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी होती. त्यांच्या समर्थ मार्गदर्शनामुळे शत्रूच्या कित्येक ठिकाणांवर यशस्वी हल्ला केला गेला. दि. १४ डिसेंबर या दिवशी शत्रूवर हल्ला करण्याच्या कामगिरीवर असताना शत्रूच्या गोळीबारात सापडून त्यांना वीरमरण आले. फ्लाइट लेफ्टनंट लॉरेन्स परेरा यांनी दाखविलेल्या असामान्य कर्तृत्वासाठी त्यांना मरणोत्तर बीरचक्र' प्रदान करण्यात आले. ५४० शिल्पकार चरित्रकोश