पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पत्रे, प्रभाकर बायाजी संरक्षण खंड पत्रे, प्रभाकर बायाजी भूसेना - शिपाई वीरचक्र १ जून १९६७ प्रभाकर बायाजी पत्रे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील वाघदरी येथे झाला. वाघदरी येथील विद्यावर्धक शेळके प्रशाला येथे आपले शिक्षण पूर्ण करून २१ जुलै १९८६ या दिवशी प्रभाकर पत्रे लष्कराच्या आठव्या महार' तुकडीत दाखल झाले. भारतीय शांतिसेनेचे सैनिक म्हणून प्रभाकर पत्रे यांची नेमणूक श्रीलंका येथे झाली होती. १६ ऑक्टोबर १९८७ रोजी लष्कराच्या दुस-या एका तुकडीला शस्त्रसाठा देण्याचे जोखमीचे काम शिपाई पत्रे यांनी आपणहून मागून घेतले. शस्त्रसाठा घेऊन जाणारे पथक हे ‘आत्मबलिदान' पथक होते. या कामगिरीवर जाताना दहशतवाद्यांकडून वारंवार हल्ले होत होते. परंतु कोणतीही भीती न बाळगता शिपाई प्रभाकर पत्रे आपल्या कामगिरीवर अटळ होते. या दरम्यान ते जखमी झाले; पण त्यांनी पुढे जाणे सोडले नाही. मोहिमेच्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांना आपल्या सैनिकांना दहशतवाद्यांनी घेराव घातल्याचे आढळले. तो घेराव मोडून काढत, लढत ते पुढे जात होते. शिपाई प्रभाकर पत्रे तो घेराव मोडून काढणारे पहिले शिपाई होते. सर्व बाजूला गोळीबार करीत ते पुढे घुसले. त्यांना छातीवर गोळ्या लागल्या; पण ते तसेच पुढे आपल्या चौकीपर्यंत पोहोचले. त्यांनी घेराव मोडल्यामुळे इतरांना नंतर सहजगतीने चौकीवर पोहोचता आले. परंतु आपले काम फत्ते करून शिपाई प्रभाकर पत्रे यांनी आपला देह ठेवला. या लढाईत दाखविलेल्या असामान्य धैर्यासाठी त्यांना मरणोत्तर ‘वीरचक्राने सन्मानित केले गेले. परांजपे, दिवाकर अनंत भूसेना - ब्रिगेडियर वीरचक्र ६ ऑगस्ट १९४० | दिवाकर अनंत परांजपे यांचा जन्म सांगली येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम विद्यालयामधून झाले. १९५५ मध्ये ५३८ शिल्पकार चरित्रकोश