पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड निंबाळकर, सचिन अण्णाराव पण कॅप्टन सचिन यांनी पळण्यासाठी कोणताच मार्ग मोकळा ठेवला नव्हता. शत्रूचे बारा सैनिक मारले गेले व या चकमकीत बरीच शस्त्रास्त्रे व दारूगोळा हस्तगत करण्यात आला. शौर्य, धैर्य व कल्पक सक्रिय नेतृत्व यांचे अतुलनीय प्रदर्शन करीत कॅप्टन सचिन निंबाळकर यांनी टायगर हिल काबीज करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांना 'वीरचक्र' प्रदान करण्यात आले. आता ते ‘मेजर' या हुद्द्यावर कार्यरत आहेत. शिल्पकार चरित्रकोश ५३७