पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निंबाळकर, सचिन अण्णाराव संरक्षण खंड लढायांमध्ये धैर्य, साहस आणि नेतृत्व सिद्ध केले. त्याद्वारे त्यांनी त्यांच्या लोकांसमोर एक उत्तम उदाहरण प्रस्तुत केले आणि त्यांचे मनोधैर्य कायम ठेवले. १९४७-४८ या काळात त्यांना 'वीरचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निंबाळकर, सचिन अण्णाराव भूसेना - मेजर वीरचक्र १९ जानेवारी १९७६ सचिन अण्णाराव निंबाळकर यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे झाला. वयाच्या एकविसाव्या वर्षी ते लष्करात दाखल झाले. १८ ग्रेनेडिअर्स ही त्यांची तुकडी होय. त्याआधी त्यांनी सातारा येथील सैनिकी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढील लष्करी शिक्षण त्यांनी पुण्याकडील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे पूर्ण केले. ऑपरेशन विजय' दरम्यान ३/४ जुलै १९९९ च्या रात्री, द्रास भागातील टायगर हिल टॉप सर करण्यासाठी पूर्वेकडून चढाई करण्याचे आदेश कॅप्टन सचिन निंबाळकर यांना देण्यात आले. त्या वेळेस कॅप्टन सचिन हे डोरा कंपनी या तुकडीत कमांडिंग अधिकारी होते. | ही चढ़ाई करताना विविध मार्गांनी साथीदारांचा मार्ग नवीन होता व त्या बाजूने शत्रूवर हल्ला करणे जवळजवळ अशक्य होते. पण १६,५०० फूट उंचीवर असलेल्या त्या दुर्गम भागात चढाई करताना कॅप्टन निंबाळकर स्वतः पुढे होऊन आपल्या साथीदारांना मार्गदर्शन करत होते. | या चढाईत शत्रूच्या तुफान गोळीबाराच्या व तोफगोळ्यांच्या मान्याबरोबरच वादळी वा-यालाही त्यांना तोंड द्यावे लागत होते. परंतु त्या तशा हवामानात, अंधाच्या रात्री न थांबता सलग १२ तास कॅप्टन सचिन व त्यांचे साथीदार मोठ्या धैर्याने चढाई करत होते. शत्रूच्या चौकीच्या जवळ आल्यावर त्यांनी एका ठिकाणी तळ करून तेथून पुढे गिर्यारोहणाच्या साहित्याच्या मदतीने कडा चढायला सुरुवात केली. कॅप्टन सचिन निंबाळकर कडा चढून वर गेले. | या बाजूने हल्ला होईल याची अणुमात्रही कल्पना नसल्याने शत्रू बेसावध होता. त्यांनी आपल्या जवानांना त्या शत्रुसैनिकांभोवती कडे करायला सांगितले व स्वयंचलित बंदुकांनी त्यांना रोखून धरले. नंतर संगिनी व सुव्यांच्या साहाय्याने एकास एक लढाई सुरू झाली. दिवस उजाडेपर्यंत ही लढाई सुरू राहिली व उजेड झाल्यावर शत्रूला एकंदर परिस्थितीची कल्पना येऊन त्याने तेथून पळ काढायचा प्रयत्न केला. शिल्पकार चरित्रकोश ५३६