पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड नादिरशा, जमशेद दादाभाऊ शत्रूने मोठ्या ताकदीने या मोर्चावर हल्ला चढवला. ह्या हल्ल्याला तोफखाना, उखळी तोफा व मशीनगनच्या जोरदार मा-याचे पाठबळ होते. | अशा प्रसंगी मेजर नंबियार यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता मोर्चातील प्रत्येक सैनिकाला प्रतिकारासाठी प्रोत्साहित केले. या धुमश्चक्रीदरम्यान शत्रू अगदी जवळ म्हणजे चाळीस याच्याही आत येऊन पोहोचला होता. परंतु मेजर नंबियार व त्यांच्या तुकडीने निकराचा प्रतिकार करून हल्ला परतवून लावला. शत्रूने दि. ११ डिसेंबर रोजी फिरून केलेला हल्लासुद्धा परतवून लावण्यात मेजर नेबियार यांनी यश मिळविले. या धुमश्चक्रीमध्ये मेजर नंबियार यांनी दाखविलेल्या असामान्य धाडस आणि नेतृत्वगुणांबद्दल त्यांना 'वीरचक्र' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुढे लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत त्यांना बढती मिळाली. नाकिल, मारुती हरी भूसेना - नाईक वीरचक्र २५ जून १९४४ - १३ डिसेंबर १९७१ | मारुती हरी नाकिल यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील नारोळी या गावी झाला. दि. २५ जून १९६२ रोजी ते लष्करात दाखल झाले. ते एकोणिसाव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये कार्यरत होते. १९७१ च्या पाकिस्तान युद्धात मध्यम पल्ल्याच्या मशीनगन विभागामध्ये ते कमांडर होते. पहिल्या आघाडीच्या सैनिक तुकडीमध्ये ते सैनिक असताना त्यांच्या तुकडीकडून करण्यात आलेल्या तोफखान्याच्या अचूक व तीव्र माच्यामुळे त्यांनी शत्रूचा नि:पात केला. त्याच वेळी दुस-या बाजूने मध्यम पल्ल्याच्या तीन मशीनगन्सच्या माध्यामुळे शत्रुसैन्य मोठ्या प्रमाणात जखमी झाले. नाकिल यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्वरित कारवाई करत शत्रूची मध्यम पल्ल्याची एक मशीनगन निकामी केली. या कारवाईत ते जखमी झाले व धारातीर्थी पडले. नाकिल यांनी दाखवलेले धैर्य व नेतृत्वगुण यांबद्दल त्यांना मरणोत्तर वीरचक्रा'ने गौरवण्यात आले. नादिरशा, जमशेद दादाभाऊ भूसेना - ब्रिगेडियर वीरचक्र १० फेब्रुवारी १९१४ जमशेद दादाभाऊ नादिरशा यांचा जन्म तारापूर येथे झाला. दि. २१ जुलै १९४० रोजी ते ६/८ गुरखा रायफल्समध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून सेवेत रुजू झाले. त्यांनी ४ ते २२ नोव्हेंबर १९४८ या काळात काश्मीर सीमेवर वेगवेगळ्या शिल्पकार चरित्रकोश