पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देशपांडे, शरच्चंद्र नरेश संरक्षण खंड येथे झाले. वयाच्या बाविसाव्या वर्षी, दि. १० जून १९९५ या दिवशी आपले शिक्षण संपवून ते सैन्याच्या सेवेत दाखल झाले. मनोज देशपांडे हे आठव्या जम्मू-काश्मीर लाइट इन्फन्ट्री या तुकडीत मेजर या हुद्द्यावर कार्यरत होते. भारताच्या उत्तर सीमेवरील सिराचीन या जगातील सर्वांत उंच सीमा क्षेत्रावर अत्यंत बर्फाळ प्रदेशात त्यांची नेमणूक झाली होती. | दि. २४ ऑगस्ट २००० रोजी जम्मू-काश्मीर क्षेत्रातील दोडा-पूंछ येथील सीमारेषेवर असलेले आपले ठाणे काबीज करण्याचा शत्रूचा प्रयत्न, मनोज देशपांडे यांनी एका खास कृतिदलाचे नेतृत्व करीत यशस्विरीत्या परतवून लावला. शत्रू या ठाण्यावर हल्ला करणार अशी खात्रीलारक बातमी गुप्तहेरांकडून समजल्यावर सैन्याने लगेच कारवाई केली. मेजर मनोज देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली तेथे पलटण (प्लॅटून) तैनात करण्यात आली; त्यामुळे त्या चौकीतील आधीच्या जवानांना आणखी बळ मिळाले. शत्रूच्या हल्ल्याआधी करण्यात आलेल्या मोठ्या गोळीबारात व तोफांच्या मान्यात प्रत्येक खंदकात जाऊन मनोज देशपांडे यांनी आपल्या जवानांना प्रोत्साहन दिले, तसेच स्वत:ही मोकळ्या खंदकात जाऊन, स्वतः शत्रूशी दोन हात करून आपल्या तुकडीतील जवानांपुढे आदर्श घालून दिला. एक शत्रुसैनिक हातगोळा फेकण्याच्या तयारीत असलेला पाहिल्यावर, त्यांनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता त्या सैनिकाजवळ जाऊन त्याला गोळी घातली. या धीट चढाईने आश्चर्यचकित होऊन शत्रूने माघार घेतली. त्यांचे बारा जवान मारले गेले व कित्येकांना शस्त्रे मागे ठेवून पळ काढावा लागला. मेजर मनोज देशपांडे यांना त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘वीरचक्र' प्रदान करण्यात आले. । द देशपांडे, शरच्चंद्र नरेश । वायुसेना - एअर व्हाइस मार्शल वीरचक्र ३० जुलै १९३७ शरच्चंद्र नरेश देशपांडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील, वडनेर तालुक्यातील गंगई या छोट्याशा गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथील श्री समर्थ, तसेच व्हीएमव्ही विद्यालयात झाले. दि. २४ डिसेंबर १९५७ रोजी ते वायुसेनेत दाखल झाले. देशपांडे हे जेट बॉम्बर कॉन्व्हर्जन युनिटच्या ‘इन्स्ट्रक्टर स्टाफ'मध्ये दिशादर्शक म्हणून कार्यरत होते. १९७१ च्या पाकिस्तान युद्धात बॉम्बर विमानांतून त्यांनी शत्रुप्रदेशातील सात मोहिमांमध्ये भाग घेतला. बॉम्बर विमानांचे प्रमुख चालक म्हणून त्यांनी त्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच प्रत्येक मोहिमेमध्ये यश मिळवले. शिल्पकार चरित्रकोश ५३२