पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड देशमुख, पांडुरंग तुकाराम या मोहिमेत त्यांनी अतुलनीय धैर्य, व्यावसायिक कौशल्य आणि कर्तव्यनिष्ठा या तीनही गुणांचे दर्शन घडवले. त्यांचा ‘वीरचक्र' देऊन सन्मान करण्यात आला. पुढे त्यांना एअर व्हाइस मार्शल पदापर्यंत बढती मिळाली. देशमुख, पांडुरंग तुकाराम भूसेना - सुभेदार मेजर, ऑनररी कॅप्टन वीरचक्र ६ नोव्हेंबर १९१६ पांडुरंग तुकाराम देशमुख यांचा जन्म साता-यातील आटपाडी या गावात झाला. दि. ६ नोव्हेंबर १९३५ रोजी ते भूसेनेत दाखल झाले. बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप' या विभागात ते कार्यरत होते. दि. ३ जुलै १९४८ रोजी त्यांना सर्वोच्च कामगिरीसाठी ‘वीरचक्र' प्रदान करण्यात आले. शिल्पकार चरित्रकोश ५३३