पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड देशपांडे, मनोज मधुकर आतवर जाऊन त्यांनी हल्ला केला. त्याच वेळी जमिनीवरून विमानविरोधी गोळीबार होत असतानाही त्यांनी पाकिस्तानची दोन विमाने नष्ट केली. याच हल्ल्यात त्यांनी शत्रूच्या हवाई तळांवर हल्ला करून तेथील साधनसामग्रीही उद्ध्वस्त केली. | या हल्ल्यावरून परतत असताना मात्र त्यांना शत्रूच्या विमानहल्ल्याला तोंड द्यावे लागले. या हल्ल्यात त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले, तरीही सुरक्षितपणे त्यांनी ते विमानतळावर परत आणले. या युद्धात त्यांनी दाखवलेले धैर्य व उत्तम व्यावसायिक कौशल्य यांबद्दल त्यांना 'वीरचक्र' प्रदान करण्यात आले. देशपांडे, प्रभाकर शांताराम भूसेना - ब्रिगेडिअर वीरचक्र १८ एप्रिल १९२८ प्रभाकर शांताराम देशपांडे यांचा जन्म मुंबई येथे झाला. पुण्यातील वाडिया महाविद्यालय, तसेच वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर दि. १२ सप्टेंबर १९४८ रोजी ते सैनिकी सेवेत रुजू झाले. मेजर प्रभाकर देशपांडे हे आर्टिलरी रेजिमेंटमध्ये तोफखाना कमांडर म्हणून कार्यरत होते. पाकिस्तानी सैन्याने बामेर भागात केलेली घुसखोरी दूर करण्यासाठी युद्धविरामानंतर भारतीर पलटण कार्यरत होती. त्या वेळी या पलटणीला साहाय्य करण्यासाठी ते तोफखान्यावर प्रमुख होते. दुस-या टप्प्यातील कारवाईच्या वेळी या तुकडीला तोफगोळे आणि मशीनगन्सच्या मान्याला सामोरे जावे लागले. त्या वेळी त्यांचा तोफखाना उघड्यावर होता. पण तरीही, स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्यांनी शत्रूला गुंतवून ठेवले. केवळ त्यामुळेच भारतीय सैन्याच्या तुकडीला सुरक्षित स्थळी पोहोचता आले. दोन वेळा ते जखमी झाले, तरीही युद्धभूमीवरून माघारी येण्यास त्यांनी नकार दिला. त्यांनी दाखविलेले धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि नेतृत्वगुण यांबद्दल त्यांना दि. १० ऑक्टोबर १९६५ रोजी 'वीरचक्र देऊन सन्मानित केले गेले. देशपांडे, मनोज मधुकर भूसेना - मेजर वीरचक्र । १३ जुलै १९७३ मनोज मधुकर देशपांडे यांचा जन्म कुरुंदवाड येथे झाला. त्यांचे शिक्षण सातारा येथील सैनिकी शाळा व पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए) शिल्पकार चरित्रकोश