पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देऊस्कर, अरुण लक्ष्मण संरक्षण खंड धैर्यावरही विपरीत परिणाम झाला. यामुळे प्रामुख्याने छांब विभागात पाकिस्तानी सैन्याची अपरिमित हानी झाली. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीचा ‘वीरचक्र' देऊन गौरव करण्यात आला. दिवाण, अश्विनीकुमार के. भूसेना - मेजर जनरल वीरचक्र २२ ऑगस्ट १९३५ हिमाचल प्रदेश येथील शिमला या शहरात अश्विनीकुमार के. दिवाण यांचा जन्म झाला. त्यांचे वडील के.एल. दिवाण हे पुढे अहमदनगर येथे स्थायिक झाले. दि. ४ डिसेंबर १९५४ या दिवशी अश्विनीकुमार लष्कराच्या सेवेत दाखल झाले. भारताच्या उत्तर सीमेकडील चूशूल या क्षेत्रातील गुरुंग हिल या भागात दि. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी चीनने हल्ला केला. चीनने मोठ्या ताकदीनिशी खूप सैन्य व दारूगोळ्यासह पद्धतशीर रितीने या भागावर मोठा हल्ला चढवला. | कॅप्टन अश्विनीकुमार दिवाण हे आपल्या रणगाड्यासह आपल्या पायदळाला शत्रूचा हल्ला परतवण्यासाठी मदत करत होते. ते स्वतः एका उघड्या वाहनात बसून आपल्या रणगाड्यांना मोठा धोका पत्करून पुढे नेत होते. उघड्या वाहनामुळे दृष्यमानता स्पष्ट होती आणि त्यात मोठा धोकाही होता. स्वत:च्या जीवाची कोणतीही फिकीर न बाळगता अश्विनीकुमार यांनी आपल्या रणगाड्यांच्या हल्ल्याचे व गोळीबाराचे संयोजन केले व शत्रूची मोठी जीवितहानी घडवून आणली. त्याशिवाय तोफगोळ्यांचा सतत मारा करून त्यांनी आपल्यापुढे गेलेल्या पायदळातील जवानांना शत्रूच्या तावडीतून सहीसलामत परत येण्यास मदत केली. | कॅप्टन अश्विनीकुमार दिवाण यांच्या विशेष धैर्य व कार्याप्रती निष्ठेसाठी त्यांचा ‘वीरचक्र' देऊन गौरव करण्यात आला. । | अश्विनीकुमार लष्करातून ‘मेजर जनरल' या पदावरून निवृत्त झाले. । द देऊस्कर अरुण लक्ष्मण वायुसेना - ग्रूप कॅप्टन वीरचक्र १४ डिसेंबर १९४४ अरुण लक्ष्मण देऊस्कर यांचा जन्म अकोला येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर दि. २५ डिसेंबर १९६४ रोजी ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले. | १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात फ्लाइट लेफ्टनंट देऊस्कर भारतीय बॉम्बफेकी विमानाचे चालक (पायलट) होते. शत्रूच्या हद्दीतील हवाई तळांवर शिल्पकार चरित्रकोश ५३०