पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जामसजी, परवेझ रुस्तम संरक्षण खंड त्याच्याकडे धाव घेतली. त्या सैनिकाला उचलून त्यांनी ताबडतोब सुरक्षित ठिकाणी आणले. अशा निधड्या छातीचा नेता लाभल्यामुळे सैनिकांचा उत्साह दुणावला व त्यांची सरशी झाली. | जाधवांनी केलेल्या भीमपराक्रमाची दखल घेऊन भारत सरकारने दि. ११ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना वीरचक्र' प्रदान केले. पुढे ते सुभेदार झाले व मानद लेफ्टनंटची पदवीही त्यांना देण्यात आली. जाधव, धोंडू गोविंद भूसेना - हवालदार वीरचक्र २० नोव्हेंबर १९२० धोंडू गोविंद जाधव यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील बामणोली देवरूख या गावी झाला. २० नोव्हेंबर १९४१ रोजी सैन्यदलात प्रवेश करून पहिल्या महार फलटणीमध्ये त्यांनी सेवेस सुरुवात केली. | १९४८च्या पाकिस्तानच्या युद्धादरम्यान पायदळाच्या कुमाऊं फलटणीबरोबर मध्यम पल्ल्याची मशीनगन चालवण्याच्या कामी त्यांची नियुक्ती करण्यात आली. १४ एप्रिल १९४८ रोजी पुढे सरकणा-या फलटणीवर जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी भागात शत्रूने स्वयंचलित तोफखान्यासह जोरदार हल्ला चढवला. शिपाई धोंडू जाधव यांनी मोठ्या कल्पकतेने एका टेकडीवर मोर्चा धरून शत्रूवर गोळीबार करण्यास प्रारंभ केला. या सर्व धुमश्चक्रीदरम्यान त्यांचा दुसरा सहकारी गंभीर जखमी झाला. तरीदेखील शिपाई धोंडू जाधव यांनी मोर्चा सांभाळून गोळीबार चालू ठेवला व शत्रूचा हल्ला परतवून लावला. | शिपाई धोंडू जाधव यांनी जे असामान्य निष्ठा आणि संयमित धैर्याचे प्रदर्शन घडवले, त्याबद्दल त्यांना १५ नोव्हेंबर १९४८ रोजी 'वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. जामसजी, परवेझ रुस्तम वायुसेना - स्क्वॉड्रन लीडर वीरचक्र २३ जून १९४३ | परवेझ रुस्तम जामसजी यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. देवळाली येथील बास्त्र विद्यालय, तसेच पुण्यातील मॉडेल विद्यालयात त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. पुण्यातील नेस वाडिया महाविद्यालयातून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. दि. १६ ऑक्टोबर १९६५ रोजी त्यांनी वायुसेनेत प्रवेश केला. १९७१ मधल्या पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईत ते हेलिकॉप्टरच्या ताफ्यात कार्यरत होते. फ्लाइट शिल्पकार चरित्रकोश ५२२