पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड जाधव, अर्जुन राघव जवळगे, उत्तम भानुदास वायुसेना - सुभेदार मेजर, ऑनररी कॅप्टन वीरचक्र ५ एप्रिल १९४३ उत्तम भानुदास जवळगे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगरुळ या गावी झाला. १९ डिसेंबर १९६२ रोजी हवाई दलात प्रवेश केल्यावर पाचशे एकाव्या हवाई संरक्षण तुकडीमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली. १९७१ च्या पाकिस्तान युद्धात छांब विभागातील पायदळ मुख्यालयाच्या संरक्षणासाठी तैनात केलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. ८ डिसेंबर १९७१ रोजी हवालदार उत्तम जवळगे यांनी अचूक मारा करून मुख्यालयावर हल्ला करणा-या चारापैकी एक पाकिस्तानी सेबर जेट विमान पाडण्यात यश मिळवले. | त्यांच्या या उच्चतम धाडस व कार्य कौशल्याबद्दल ८ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ज । जाधव, अर्जुन राघव भूसेना - सुभेदार आणि मानद लेफ्टनंट वीरचक्र । १ जुलै १९३८ अर्जुन राघव जाधव यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील धामणदेवी या छोट्याशा गावात झाला. त्यांना लहानपणापासून सैनिकी पेशाची आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी सैन्यभरतीत आपले नाव नोंदविले. आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करत १९७१ पर्यंत जाधव नारब सुभेदाराच्या पदावर पोहोचले. याच साली पाकिस्तान युद्धाच्या वेळी आघाडीवरील पूर्व विभागातील एका प्लॅटूनचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. शत्रूच्या ताब्यातील पूल जिंकून घेतल्यावर प्लॅटूनची पुनर्रचना करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांना ठाण्याच्या जागी खंदक खोदायचा होता. पण त्याआधीच शत्रूने सैन्याची जमवाजमव करून पुन्हा हल्ला चढविला. । शत्रूकड़े तोफा आणि मध्यम आकाराच्या मशीनगन्स होत्या. त्यांच्या तुलनेत जाधवांकडील सैन्यबळ अगदीच तोकडे होते. परंतु जाधव डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या सेनेला धीर दिला व निकराचा हल्ला चढविला. त्यामुळे शत्रूला माघार घ्यावी लागली; पण शत्रूने लगेच पुन्हा हल्ला केला. या वेळच्या चकमकीत जाधवांच्या सेनेतील एक जवान जबर जखमी होऊन रणभूमीवर कोसळला. ते पाहताच जाधवांनी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता शिल्पकार चरित्रकोश ५२१