पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड जुन्नरकर, नितीन गजानन लेफ्टनंट जामसजी ज्या हेलिकॉप्टरचे चालक होते, त्यावर शत्रूकडून दोन वेळा हल्ला झाला. मशीनगन्स आणि तोफांच्या मान्यातूनही आपले विमान वाचवून त्यांनी सोपवलेली कामगिरी पूर्ण केली आणि हेलिकॉप्टर सुखरूपपणे तळावर आणले. अशाच एका कारवाईत त्यांच्या हेलिकॉप्टरचे इंजीन शत्रूच्या हद्दीतच बंद पडले. तरीही मोठ्या कौशल्याने ते हेलिकॉप्टर त्यांनी सुरक्षितपणे परत आपल्या हद्दीत आणले. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना दि. १६ डिसेंबर १९७१ रोजी वीरचक्र प्रदान करण्यात आले. पुढे ‘स्क्वॉड्रन लीडर' या पदावरही त्यांना बढती मिळाली. जुन्नरकर, नितीन गजानन वायुसेना - फ्लाईट लेफ्टनंट वीरचक्र जन्म-मृत्यु दिनांक अनुपलब्ध पाकिस्तानविरूद्धच्या डिसेंबर १९७१ मधील युद्धात फ्लाईट लेफ्टनंट नितीन जुन्नरकर यांनी आपल्या शौर्याचे दर्शन घडविले. शत्रूच्या ठिकाणांची अचूक माहिती भारतीय सैन्याला मिळणे आवश्यक होते अशावेळी जुन्नरकर यांनी आपले प्राण संकटात टाकून विमानाने शत्रूच्या ठिकाणांची पाहणी केली. त्यांनी शत्रूच्या ठाण्यांची अनेक छायाचित्रे आणली. त्यांनी आणलेल्या माहिती आणि छायाचित्रांमुळे भारतीय सैन्याला शत्रूवर विजय मिळविणे अधिक सोपे गेले. त्यांचे हे योगदान महत्त्वाचे होते. फ्लाईट लेफ्टनंट नितीन जुन्नरकर यांनी धैर्य, कौशल्य आणि देशसेवेचे दर्शन घडविले. शिल्पकार चरित्रकोश ५२३