पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गायकवाड, तात्याबा संरक्षण खंड अशा अवघड परिस्थितीतही ते डगमगले नाहीत. १४ नोव्हेंबर या दिवशी पिनद्रास येथील ब्राउन हिलवरील हल्ल्यात हवालदार गमे यांनी अशीच कामगिरी पार पाडली. या युद्धादरम्यान शत्रूचा सामना करताना अमृत नामा गमे यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल दि. १५ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांना 'वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. । ग गरुड, गोपाळ कृष्ण वायुसेना - एअर कमोडोर वीरचक्र ५ जानेवारी १९३८ गोपाळ कृष्ण गरुड यांचा जन्म पुणे येथे झाला. अहमदनगर महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी खडकवासला, पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये सैनिकी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. दि. १९ डिसेंबर १९६१ रोजी त्यांची वायुसेनेत नियुक्ती करण्यात आली. सप्टेंबर १९६५ मध्ये फ्लाइट लेफ्टनंट गोपाळ गरुड शत्रूच्या भूभागाची टेहळणी करणा-या विमानांच्या तुकडीत चालक म्हणून काम करत होते. हे टेहळणीचे काम अतिशय धोकादायक असते कारण, हे काम भरदिवसा, आणि कोणत्याही संरक्षणाशिवाय केले जाते. पाकिस्तानबरोबरच्या युद्धांमध्ये त्यांनी नेहमीच अत्यंत जोखमीची कामगिरी स्वीकारून शत्रूची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळवून आणली. या माहितीच्या आधारेच अनेक योजना आखणे व त्या यशस्विरीत्या पूर्ण करणे शक्य झाले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी उच्चतम धैर्याचे व कार्यकुशलतेचे उदाहरण समोर उभे केले. या कार्याबद्दल त्यांना दि. २२ सप्टेंबर १९६५ रोजी ‘वीरचक्र' देऊन सन्मानित करण्यात आले. गायकवाड, तात्याबा भूसेना - नाईक वीरचक्र | जम्मू-काश्मीरच्या १९४७-१९४८च्या युद्धात दि. ३ मार्च १९४८ रोजी शत्रूशी लढत असताना मेजर चोप्रा यांना शत्रूच्या गोळीबारामध्ये वीरमरण प्राप्त झाले. त्या वेळी शत्रूच्या ताब्यात असलेल्या जागेवरून त्यांचे शव आणण्यासाठी नाईक तात्याबा गायकवाड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी होते. अतिशय धोकादायक परिसरातून सरपटत जाऊन, शत्रूच्या गोळीबाराला चुकवत तात्याबा गायकवाडांनी मेजर चोप्रांचे शव ताब्यात घेतले. पण तेवढ्यात शिल्पकार चरित्रकोश ५१४