पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड गुरव, कृष्णा एकनाथ शत्रूची गोळी तात्याबांचे सहकारी शिपाई गुदेकर यांना लागली व ते जखमी झाले. अशा बिकट प्रसंगात प्रसंगावधान राखून व थंड डोक्याने तात्याबांनी मेजर चोप्रांचे शव आणि जखमी शिपाई गुदेकर यांना सुरक्षित जागेत आणले; परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच गुदेकर यांचा मृत्यू झाला होता. | अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये नाईक गायकवाड आपले दुसरे सहकारी शिपाई सुधीर चाळके यांच्या मदतीने दोन्ही शहीद जवानांचे मृतदेह शत्रूच्या गोळीबाराला सामोरे जाऊन कंपनी क्षेत्रामध्ये घेऊन आले. या बहादुरीबद्दल नाईक तात्याबा गायकवाड यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले. गुरव, कृष्णा एकनाथ भूसेना - नायब सुभेदार वीरचक्र १२ मे १९३४ | कृष्णा एकनाथ गुरव यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कवठे-एकंद या गावी झाला. दि. ६ फेब्रुवारी १९५७ रोजी त्यांनी सैन्यदलात प्रवेश केला व मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये हवालदार म्हणून सेवा करण्यास सुरुवात केली. । १९७१ च्या पाकिस्तान युद्धात त्यांच्याकडे मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या मध्यम पल्ल्याच्या मशीनगन तुकडीचा अधिकारी म्हणून जबाबदारी होती. पूर्व भागात शत्रूला रोखण्यासाठी त्यांनी रस्त्यात एक अडथळा उभा केला होता. दि. १० डिसेंबर १९७१ रोजी शत्रुसैन्याने मोठ्या संख्येने व ताकदीने या मोर्चावर हल्ला केला. हवालदार गुरव यांनी निकराचा व अचूक मारा करत हा हल्ला परतवून लावला. यानंतर शत्रुसैन्याने नवीन व्यूहरचनेत एकत्र जमून मशीनगन नसलेल्या बाजूने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हवालदार गुरव यांनी स्वत:च्या जिवाची अजिबात पर्वा न करता आपल्या मशिनगनचा मोर्चा वळवून उघड्या बाजूवर आणला व शत्रूचा हा डावही हाणून पाडला. या प्रयत्नात शत्रूचे ७७ जवान मृत्युमुखी पडले. याच चकमकीदरम्यान हवालदार कृष्णा गुरव यांनी असामान्य धैर्य, निष्ठा व कौशल्याचे दर्शन घडवले. याचसाठी त्यांना दि. ११ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र' देऊन सन्मानित करण्यात आले. शिल्पकार चरित्रकोश ५१,