पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड गणपती, नंदेपांडा अप्पाचू ग । गणपती, नंदेपांडा अप्पाचू वायुसेना-स्क्वॉड्रन लीडर वीरचक्र २६ जानेवारी १९४३ नंदेपांडा अप्पाचू गणपती यांचा जन्म महाराष्ट्रातील सोमरपेट येथे झाला. आता ते कर्नाटकात बंगळुरू येथे स्थायिक झाले आहेत. लेफ्टनंट कर्नल एम.ए. गणपती हे त्यांचे वडील होते. दि. १६ मे १९६५ रोजी ते वायुसेनेत दाखल झाले. | दि. २२ नोव्हेंबर १९७१ रोजी २ वाजून ५० मिनिटांनी भारताच्या हद्दीत घुसलेल्या चार पाकिस्तानी विमानांना पाडण्याचे आदेश त्यांना मिळाले. त्या वेळी एन.ए. गणपती चार नॅट विमानांच्या तुकडींपैकी क्रमांक तीनच्या विमानाचे चालन करत होते. | गणपती यांनी आपल्या युद्धकौशल्याचा पुरेपूर उपयोग करत शत्रूच्या एका सेबर जेटला जमीनदोस्त केले. त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांना दि.२२ नोव्हेंबर १९७१ रोजी वीरचक्र' देऊन गौरविण्यात आले. गग्ने, अमृत नामा भूसेना - सुभेदार वीरचक्र १ मार्च १९२१ अमृत नामा गमे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील बोरसूड या गावी झाला. दि. १ मार्च १९४० रोजी लष्करी नोकरीत प्रवेश केल्यावर महार फलटणीमध्ये त्यांची हवालदार या पदावर नियुक्ती करण्यात आली. | दि. २ नोव्हेंबर १९४८ रोजी झोजिला पास येथील माचोई तळावर हल्ला करण्याच्या आक्रमक तुकडीमधील मशीनगन चालवणा-या तुकडीचे नेतृत्व हवालदार गमे यांच्याकडे होते. आक्रमक तुकडीला त्रासदायक ठरणा-या शत्रूच्या स्वयंचलित मोर्चाला नष्ट करण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले होते. त्यांनी शत्रूला इतक्या कुशलतेने गुंतवून ठेवले, की आक्रमक तुकडीला आपल्या लक्ष्याच्या दिशेने पुढे सरकणे सहजसाध्य होऊन गेले. या चकमकीदरम्यान हवालदार गमे यांना स्वतः जोरदार गोळीबाराचा सामना करावा लागला; परंतु शिल्पकार चरित्रकोश