पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड क कुरणकर, श्रीधर विठ्ठल किरतकुडे, आबा कोंडिबा भूसेना - सुभेदार वीरचक्र । १६ डिसेंबर १९२३ आबा कोंडिबा किरतकुडे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील भोसरे येथे झाला. दि. १६ डिसेंबर १९४३ रोजी किरतकुडे महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले. | दि. २३ जून १९४८ हा दिवस त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण ठरला. या दिवशी शत्रूने मशीनगनमधून गोळीबार आणि बॉम्बफेक करण्यास सुरुवात केली. किरतकुडे यांनी शत्रूला जोरदार गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. त्यांच्या गोळीबारामुळे शत्रूचे ११ सैनिक ठार झाले. पुन्हा दि. २९ जून १९४८ रोजी शत्रूने आपल्या सैन्यावर जोरदार हल्ला केला. या वेळी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत लान्स नाईक किरतकुडे यांनी लढा दिला व शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर काही क्षणांतच शत्रुसैन्याकडून होणारा गोळीबार थंडावला. ते पाहून किरतकुडे यांनी दुस-या बंकरकडे धाव घेतली. परंतु, शत्रूकडून झालेल्या गोळीबारात दुर्दैवाने ते जखमी झाले. अशा जखमी अवस्थेतही मागे फिरण्यास त्यांनी नकार दिला आणि शत्रूवर गोळीबार करणे सुरूच ठेवले. किरतकुडे यांनी शत्रूशी लढताना दाखवलेले कौशल्य, एकाग्रता आणि साहसाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. कुरणकर, श्रीधर विठ्ठल भूसेना - नाईक वीरचक्र २ जून १९५६ श्रीधर विठ्ठल कुरणकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील जाधेवाडी या गावात झाला. दि. ३१ ऑक्टोबर १९७४ पासून त्यांनी भारतीय पायदळातील गढ़वाल रायफल्सच्या अठराव्या फलटणीमध्ये सेवेस सुरुवात केली. । | दि. ८ जुलै १९८९ रोजी आठ जणांच्या टेहळणी पथकाला मोटरसायकलवरून जाणारे दोन अतिरेकी दृष्टीस पडले. भारतीय सैन्याचे वाहन पाहिल्याबरोबर त्या अतिरेक्यांनी घाबरून आपली मोटरसायकल सोडून दिली व ते जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्यांच्यातला एक अतिरेकी कुंपण व इतर बांधकामांचा फायदा उठवून निसटला. नाईक श्रीधर कुरणकर त्या वेळी कमांडिंग ऑफिसरच्या गाडीवर चालक होते. त्यांनी ताबडतोब दुस-या अतिरेक्याचा पाठलाग करण्यासाठी गाडी वळवली. नाईक कुरणकरांनी अतिरेक्याला धडक देऊन पाडले. गाडी अतिरेक्याच्या शिल्पकार चरित्रकोश ५०९