पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड कुरणकर, श्रीधर विठ्ठल अंगावरून जाण्याअगोदरच त्यांच्याकडून नकळत ब्रेक दाबले गेले व गाडी तत्काळ जागच्याजागी थांबली. | नाईक कुरणकर, कमांडिंग ऑफिसर व रायफलमन सुरेश कुमार यांनी गाडीतून उड्या मारल्या व ते पुढच्या बाजूला अतिरेक्याला पकडण्यासाठी धावले. पण तोपर्यंत तो अतिरेकी धक्क्यातून सावरला होता व एके-४७ हातांत ठेवून पवित्रा घेऊन बसला होता. | केवळ दीड मीटरवर अतिरेकी हल्ल्याच्या तयारीत असल्याचे पाहून कुरणकर यांनी कमांडिंग ऑफिसरला बाजूला ढकलले व ते स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्या अतिरेक्यावर धावून गेले. अतिरेक्याच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या त्यांच्या छातीत व डोक्यात घुसल्या व गंभीर जखमी होऊन ते खाली कोसळले. या जखमांमुळे त्यांचा नंतर मृत्यू झाला. | कुरणकर यांनी अतिरेक्यांशी लढताना अद्वितीय पराक्रम गाजवला आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. या कामगिरीबद्दल त्यांना दि. २६ जानेवारी १९९० रोजी मरणोत्तर ‘वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५१० शिल्पकार चरित्रकोश