पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कितकुले, प्रकाश दिगंबर संरक्षण खंड हवालदार पांडुरंग काकफळे यांची श्रीलंकेतील भारतीय शांतिसेनेमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. दि. १२ ऑक्टोबर १९८७ रोजी मारुथ्नामॅडम शहर जिंकण्यासाठी हल्ला करणाच्या कंपनीमध्ये ते सेक्शन कमांडर होते. या कंपनीला जोरदार प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. यात हवालदार काकफळे गंभीररित्या जखमी झाले. स्वत:च्या जखमांची पर्वा न करता ते आपल्या तुकडीचे नेतृत्व करीत राहिले. त्यांनी स्वत: शत्रूचा मशिनगन असणारा बंकर उद्ध्वस्त केला. | त्या वेळी झालेल्या लढाईत त्यांना शत्रूच्या गोळ्याचा आघात झाला व त्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले. हवालदार काकफळे यांनी अद्वितीय धाडस व निष्ठा यांचे प्रदर्शन घडवीत सर्वोच्च बलिदान दिले. या कामगिरीबद्दल त्यांना मरणोत्तर वीरचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कितकुले, प्रकाश दिगंबर भूसेना - लेफ्टनंट कर्नल वीरचक्र २१ एप्रिल १९४६ | प्रकाश दिगंबर कितकुले यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर दि. ३० जून १९६३ रोजी ते तोफगोळा विभागात दाखल झाले. | लष्करी सेवेत दाखल होताच केवळ आठच वर्षांत त्यांच्यावर पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात कामगिरी बजावण्याची मोलाची संधी प्राप्त झाली. त्यांनी या संधीचे अक्षरश: सोने केले असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. त्या वेळी ते मेजर पदावर कार्यरत होते. युद्धात त्यांची रेजिमेंट पूर्व सीमेवर तैनात करण्यात आली होती. एका क्षणी त्यांना शत्रूचे सैन्य हल्ला करण्यासाठी सज्ज होत असल्याचे लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करत कितकुले यांनी तोफगोळ्यांचा अचूक मारा करीत शत्रूला गुंतवून ठेवले. त्यांनी तोफगोळ्यांचा तुफान मारा करीत शत्रूचे मोठे नुकसान केले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य सैरभैर झाले. | याचा अचूक फायदा उठवीत भारतीय सैन्याने शत्रूवर जोरदार हल्ला चढविला. या अचानक झालेल्या हल्ल्याने शत्रूचे सैन्य पुरते गांगरून गेले आणि त्यांनी घाईघाईने या भागातून चक्क माघार घेतली. या मोलाच्या कामगिरीमध्ये कितकुले यांनी अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन घडविले. त्यांच्या या कामगिरीमुळे मेजर प्रकाश कितकुले यांना ङ्गवीरचक्रङ्ख सन्मान देऊन गौरविण्यात आले. ५०४ शिल्पकार चरित्रकोश