पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड क कविना, बहादूर नरीमन कर्णिक, सुरेश दामोदर वायुसेना - विंग कमांडर वीरचक्र ५ मे १९३५ सुरेश दामोदर कर्णिक यांचा जन्म मुंबई येथे झाला. दि. १८ जानेवारी १९५६ रोजी त्यांनी भारतीय वायुसेनेत स्क्वॉड्रन लीडर म्हणून सेवेस सुरुवात केली. १९७१ च्या पाकिस्तान युद्धात त्यांच्याकडे बॉम्बफेकी विमानांच्या तुकडीचे नेतृत्व होते. या युद्धाच्या काळात त्यांनी पूर्व आणि पश्चिम आघाड्यांवर, दिवसा आणि रात्री झालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या, एकूण सहा अत्यंत कठीण व महत्त्वाच्या मोहिमांमध्ये भाग घेतला. त्यांमध्ये शत्रूच्या विमानतळांवर दिवसा व रात्रीचे हल्ले करणे अशा प्रकारच्या कामांचा समावेश होता. कर्णिक यांनी या युद्धादरम्यान नेतृत्व, धाडस या गुणांचे व व्यावसायिक कौशल्याचे उच्चतम प्रदर्शन घडविले. त्यांना दि. १८ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. कल्याणीवाला, रुस्तुम सोराबजी वायुसेना - स्क्वॉड्रन लीडर वीरचक्र २४ ऑक्टोबर १९२९ रुस्तुम सोराबजी कल्याणीवाला यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण सेंट झेवियर्स शाळा, मुंबई आणि दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई येथे झाले. त्यांचा काश्मीर खो-यातील उत्तर विभागामधील उड्डाण मोहिमांमध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. झोजीला खिंडीजवळच्या उंच टेकड्यांवरील शत्रूच्या चौक्यांवरील हल्ले व अचूक बॉम्बवर्षाव यांमध्ये त्यांनी आदर्श घालून दिला. या हवाई हल्ल्यानंतर जमिनीवर हल्ले सुरू झाले. त्यांच्या या हल्ल्यांमुळे भूसेनेस सहकार्य लाभले. गुमरीजवळच्या एका हल्ल्यामुळे आपल्या सैन्याला द्रासपर्यंत पोहोचणे शक्य झाले. रुस्तुम कल्माणीवाला यांना दि. २० नोव्हेंबर १९५० रोजी ‘बीरचक्र प्रदान करण्यात आले. कविना, बहादूर नरीमन नौसेना - लेफ्टनंट कमांडर वीरचक्र १ मार्च १९३७ | बहादुर नरीमन कविना यांचा जन्म भुसावळ येथे झाला. नाशिकमधील बॉइज टी विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबईतील जयहिंद, तसेच के.सी. महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. दि. १ जुलै १९६० रोजी ते भारतीय शिल्पकार चरित्रकोश ५०५