पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| क| कर्डिले, एकनाथ महिपती संरक्षण खंड म्हणून काम पाहत होते. शत्रूनेही त्वरीत हालचाल करीत आपल्या सैन्यावर जोरदार गोळीबाराला सुरूवात केली. त्यामुळे बरेचसे सैनिक जखमी झाले. कॅप्टन करकरे यांनी शत्रुकडील रेडिओ यंत्रणा (बिनतारी संदेश यंत्रणा) हस्तगत करून त्याद्वारे शत्रूची दिशाभूल केली. त्यामुळे गोळीबाराची दिशा बदलली. त्यामुळेच तुकडीतील सैनिकांची प्राणहानीही टळली. दुस-या दिवशी म्हणजे आठ डिसेंबरच्या सकाळी शत्रूने अगदी निर्धाराने पायदळ आणि तोफखान्याच्या मदतीने आपल्या सैन्यावर प्रतिहल्ला चढवला. आपल्या सैन्यावर तोफखाना आणि लहान शस्त्रास्त्रांचा वर्षाव सुरू झाला. तरीही न डगमगता करकरे यांनी तोफखान्याला अचूक दिशा दिली. शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करीत त्यांना मागे हटवले, आपले सैन्य त्या ठिकाणाहून बाहेर पडेपर्यंत त्यांनी शत्रूला गुंतवून ठेवले. मात्र करकरे तिथून बाहेर पडत असताना त्यांना वर्मी गोळी लागून जागीच वीरमरण आले. यावेळी त्यांनी दाखवलेले शौर्य, नेतृत्वगुण याबद्दल त्यांना मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले. कर्डिले, एकनाथ महिपती भूसेना - नाईक वीरचक्र ७ मार्च १९४० - ४ डिसेंबर १९७१ एकनाथ महिपती कर्डिले यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील बुरहाणनगर गावात झाला. दि. २० ऑक्टोबर १९६१ पासून त्यांनी भूसेनेतील पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये सेवेस सुरुवात केली. | दि. ४ डिसेंबर १९७१ च्या रात्री मराठा लाइट इन्फन्ट्रीकडे पूर्व विभागातील शत्रूचे एक ठाणे काबीज करण्याची कामगिरी सोपवण्यात आली. सैन्याने योजनेप्रमाणे हल्ला चढविला. परंतु, शत्रूच्या मोर्चातील एका बंकरमधील मध्यम पल्ल्याच्या मशिनगनमधून अचूक व सातत्यपूर्ण मारा होत होता. त्यामुळे आपल्या सैन्याची आगेकूच थोपवून धरली गेली होती. कर्डिले यांनी त्या बंकरवर हल्ला चढवला व मशिनगनचा मारा बंद पाडण्यात यश मिळविले. त्यामुळे भारतीय सैन्याला शत्रूचे ठाणे जिंकून घेणे शक्य झाले. परंतु, हे करत असताना मशिनगनची एक गोळी कर्डिले यांच्या वर्मी लागली आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले. एकनाथ महिपती कर्डिले यांनी शत्रूशी दोन हात करताना अद्वितीय पराक्रम आणि जिद्दीचे प्रदर्शन घडवीत देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. या कामगिरीबद्दल कर्डिले यांना मरणोत्तर वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५०४ शिल्पकार चरित्रकोश