पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कांबळे, काशिनाथ शिवरुद्र संरक्षण खंड नौसेनेत दाखल झाले. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान घनघोर युद्ध झाले. भारतीय सेनेने त्यात अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन केले. पाकिस्तानबरोबरच्या युद्धामध्ये त्यांनी कराची बंदरावर हल्ला करणा-या नौसेनेच्या ताफ्यातील एका लढाऊ जहाजाचे नेतृत्व केले. शत्रूच्या संरक्षक फळीकडून होणारा मारा व हवाई हल्ल्याचा धोका यांची पर्वा न करता त्यांनी शत्रूवर निकराचा हल्ला चढवला. बहादूर नरीमन कविना यांच्या निधड्या नेतृत्वामुळेच पाकिस्तानी नौसेनेला जबरदस्त दणका देणे भारतीय नौसेनेला शक्य झाले. त्यांच्या, तसेच इतर नौसेना तुकड्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे शत्रूच्या जहाजांचा ताफा बंदरातच नष्ट करणे नौसेनेस शक्य झाले. या युद्धात त्यांनी दाखविलेले असामान्य धाडस, निष्ठा व नेतृत्वगुणांसाठी दि. १८ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना ‘वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कांबळे, काशिनाथ शिवरुद्र भूसेना - शिपाई वीरचक्र ५ मे १९५२ | काशिनाथ शिवरुद्र कांबळे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील धाफळपूर येथे झाला. दि. १३ सप्टेंबर १९७० पासून त्यांनी भारतीय भूसेनेतील दुस-या महार फलटणीमध्ये सेवा करण्यास सुरुवात केली. | १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात राजस्थान भागातील पर्वत अली येथे हल्ला करण्यासाठी निघालेल्या महार फलटणीच्या कंपनीमध्ये त्यांचा समावेश होता. ही कंपनी वाटचाल करीत जेव्हा आपल्या लक्ष्यापासून केवळ ५० यावर पोहोचली, तेव्हाच शत्रूने मध्यम पल्ल्याच्या मशीनगनचा जोरदार मारा चालू केला. या मान्यात कंपनीचे भारी नुकसान होऊ लागले. शिपाई कांबळे यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शत्रूच्या मशीनगन मोर्चावर निकराचा हल्ला चढवला. या प्रयत्नात ते गंभीर जखमी झाले. तशाही परिस्थितीत ते मुळीच डगमगले नाहीत. आपल्या जखमांची पर्वा न करता ते शत्रूच्या दिशेने सरपटत पुढे सरकले व एक हातगोळा टाकून त्यांनी शत्रूचा तो मोर्चा उद्ध्वस्त केला. या चकमकीत झालेल्या जखमांमुळेच त्यांचा युद्धक्षेत्रावरच मृत्यू झाला. | शिपाई काशिनाथ कांबळे यांनी अद्वितीय धाडस व निष्ठेचे एक उदाहरणच सादर केले. या कामगिरीबद्दल त्यांना दि. १२ डिसेंबर १९७१ रोजी मरणोत्तर ‘बीरचक्र' प्रदान करण्यात आले. शिल्पकार चरित्रकोश ५०६