पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड कडू, मच्छिंद्र रामभाऊ । क । क कडू, मच्छिंद्र रामभाऊ भूसेना - शिपाई वीरचक्र २३ नोव्हेंबर १९२४ | मच्छिंद्र रामभाऊ कडू यांचा जन्म नगर जिल्ह्यातील आपटी या गावी झाला. दि. २३ नोव्हेंबर १९४३ रोजी भूसेनेत प्रवेश करून त्यांनी मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या (पॅराटूपर) तुकडीमध्ये सेवेस सुरुवात केली. । | १९४८ मधल्या पाकिस्तान युद्धामध्ये पथरारी येथील शत्रूच्या भक्कम तळावर हल्ला करताना शिपाई कडू यांच्याकडे ब्रेनगन सांभाळायची जबाबदारी होती. या हल्ल्यादरम्यान त्यांच्या उजव्या हाताला व हनुवटीला जखम झाली. या जखमांची कोणालाही कल्पना न देता त्यांनी शत्रूवर आपल्या ब्रेनगनमधून गोळीबार चालू ठेवला. लवकरच त्यांच्या मांडीमध्येसुद्धा गोळी घुसली. त्यांच्या वरीष्ठ अधिका-याने त्यांना माघार घेण्यास सांगितले. परंतु, त्यांनी माघार घेण्यास नकार देत हल्ला सुरूच ठेवला. त्यांनी मोर्चा जिंकला; पण ते बेशुद्ध पडले. स्वत:च्या जखमांची व जिवाची पर्वा न करता त्यांनी कार्याप्रती उच्चतम निष्ठा आणि अपूर्व धाडसाचे दर्शन घडविले. त्याबद्दल दि. २३ नोव्हेंबर १९४८ रोजी ‘वीरचक्र' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. करकरे, अशोक कुमार भूसेना - कॅप्टन वीरचक्र ३० जून १९४३ - ८ डिसेंबर १९७१ अशोक कुमार करकरे यांचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. ३ मे १९६४ रोजी त्यांची भारतीय लष्करात नेमणूक झाली. करकरे यांचे शिक्षण नवी दिल्लीतील एअर फोर्स सेंट्रल येथे झाले. त्यानंतर त्यांनी चंदिगड शासकीय महाविद्यालयातून पदवी घेतली. लंडनमधील ख्राईस्ट महाविद्यालयामधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. पश्चिम विभागातील खारला तळावर हल्ला करण्याकरता, राजपूत रेजिमेंट बरोबर कॅप्टन करकरे हे तोफखाना रेजिमेंट निरीक्षक अधिकारी शिल्पकार चरित्रकोश ५०३